You are currently viewing केंद्रशाळा शेर्पे शाळेत विद्यार्थी बनले शिक्षक

केंद्रशाळा शेर्पे शाळेत विद्यार्थी बनले शिक्षक

*केंद्रशाळा शेर्पे शाळेत विद्यार्थी बनले शिक्षक*

कणकवली

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा शेर्पे ,तालुका कणकवली या शाळेमध्ये 5 सप्टेंबर 2023 रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .सुरुवातीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिराव फुले ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिगारे यांनी केले .प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते .
शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेमध्ये एक दिवस शाळेचे संपूर्ण शैक्षणिक व शालेय व्यवस्थापन विद्यार्थी शिक्षकांनी पाहिले .शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कुमारी शमिका पोतकर – इयत्ता ७वी व उपमुख्याध्यापक म्हणून कुमार वैभव शेलार इयत्ता ७वी यांनी कामकाज पाहिले .तर शिक्षक म्हणून इयत्ता ३री ते ७वी पर्यंतच्या – ३७ विद्यार्थ्यांनी दिवसभर शाळेचे कामकाज पाहिले .
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली . मार्गदर्शन मुख्याध्यापक दशरथ शिंगारे शिक्षक वृंद मोहिनी पाटील, अमरिन शेख, कविता हरकुळकर यांनी केले .शिक्षक दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण नियोजन शाळेचे शिक्षक -अमरीन शेख, विद्यार्थी मुख्याध्यापक -शमिका पोतकर व उपमुख्याधापक -वैभव शेलार यांनी केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा