You are currently viewing शिक्षक भरतीत स्थानिक डी एड बेरोजगारांना संधी द्या…

शिक्षक भरतीत स्थानिक डी एड बेरोजगारांना संधी द्या…

शिक्षक भरतीत स्थानिक डी एड बेरोजगारांना संधी द्या…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनची वार्षिक मेळाव्यात मागणी..

सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील डीएड बेरोजगार तरुणांच्या वाढत्या वयाचा विचार करून आणि पोर्टलचा विचार न करता शिक्षक भरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे. असा ठराव सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वार्षिक मेळाव्यात करण्यात आला.

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग चा वार्षिक मेळावा कणकवली “वृंदावन” सभागृह येथे संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्हाभरातील ३०० हून अधिक सेवानिवृत्त शिक्षक सहभागी झाले होते. या वार्षिक मेळाव्यात विविध विषयावर चर्चा होऊन सर्वानुमते विविध ठराव मंजूर करण्यात आले.

यामध्ये जिल्ह्यातील पात्र बेरोजगार डी एड उमेदवारांना दुर्लक्षित करून काही सेवानिवृत्त शिक्षकांनी धनाच्या लोभापाई पुन्हा सेवा पत्करली आहे .ज्या सेवानिवृत्त शिक्षकांनी बेरोजगार तरुणांच्या पोटावर मारून सेवा पत्करली असेल त्यांचा व शासन धोरणाचा या मेळाव्यात निषेधाचा ठराव घेण्यात आला. तसेच जिल्ह्यातील अनेक तरुणानी शिक्षक पात्र पदविका धारण केली आहे. ते अजून नोकरी पासून वंचित आहेत. त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून शासनाने पोर्टलचा विचार न करता नव्याने होणाऱ्या शिक्षक भरतीत स्थानिक बेरोजगार तरुणांना प्राधान्य द्यावे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांच्या ११०० जागा रिक्त आहेत. तर पदविका धारकांची संख्या जिल्ह्यात १००० एवढी आहे .तरी शिक्षण मंत्री व पालकमंत्री यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. तसेच जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकानी धनाच्या लोभापोटी आपल्याच विद्यार्थ्यावर अन्याय करून नवी सेवा पत्करु नये. असा ठराव सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वतीने कणकवली येथील वार्षिक मेळाव्यात घेण्यात आला. तसेच यापुढे निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वतीने बेकार तरुणांच्या संघर्षात ताकदीनिशी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व तसा ठरावही या मेळाव्यात ३०० सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपस्थितीत संमत करण्यात आला आहे. अशी माहिती सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा