You are currently viewing भांडुप एस विभागाचे मलेरिया निरिक्षक सदानंद वसंत दळवी यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी कर्मचाऱ्यांकडून आठवणींना उजाळा

भांडुप एस विभागाचे मलेरिया निरिक्षक सदानंद वसंत दळवी यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी कर्मचाऱ्यांकडून आठवणींना उजाळा

मुंबई –

“कोरोना सारख्या महामारीने मानव जातीला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत असताना आमच्या आरोग्य विभागातील मलेरिया निरिक्षक सदानंद वसंत दळवी हे मुळात स्वच्छताप्रिय कर्मचारी म्हणून सेवेत परिचित होते. खरं तर ही चांगली गोष्ट आहे. आरोग्य सेवेत राहून त्यांनी विविध छंद जोपासले आहेत. त्यांनी आता नव्याने काही तरी करण्याचा प्रयत्न करावा” असे भांडुप एस विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश वायदंडे यांनी दळवी यांच्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पकरंडक  प्रदान करून सन्मानित करताना प्रतिपादन  केले.

यावेळी आपल्या सत्कारादाखल बोलताना सदानंद दळवी यांनी आजच्या दिवशी माझ्याबद्दल आपण सर्वजण व्यक्त झालात ते पाहता मी भारावून गेलो. आपल्या सोबत व्यतीत केलेला सहवास सैदव स्मरणात राहील. तसेच आपण मला घरच्या सदस्यासारखे वागविले  आणि जे सहकार्य केले त्याबद्दल आपल्या सर्वांचा ऋणी असल्याचे नमूद केले. सौ. श्रध्दा दळवी म्हणाल्या की, पुस्तक वाचनासोबत बऱ्याच आवडी निवडी भरपूर आहेत. पण दळवी यांचे स्वच्छतेचे काही किस्से सांगून विविध पैलू उलगडून सांगितले. यावेळी मयुरी दळवी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक सुरेश पवार, नित्यानंद पाटील, मलेरिया निरिक्षक नागेश अबुर्ले,  प्रेरणा वाझे, आसावरी लाडके, अन्वेषक अमोल चव्हाण, आदींनी दळवी यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी श्रद्धा दळवी यांना प्रेरणा वाझे, सुनंदा सोनावणे यांच्या हस्ते सौभाग्याचे लेणे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यालयातील कर्मचारी वृंदाच्यावतीने दळवी यांना भेट प्रदान करून गौरविण्यात आले. या रंगातदार सोहळ्याचे सूत्रसंचालन मलेरिया निरिक्षक रविंद्र जाधव यांनी अतिशय सुबक केले. तर आभारप्रदर्शन स्वच्छता निरीक्षक मिलिंद पारकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा