You are currently viewing शिक्षकांच्या मागण्या मान्य होण्यासाठी देशव्यापी संप यशस्वी करणार…

शिक्षकांच्या मागण्या मान्य होण्यासाठी देशव्यापी संप यशस्वी करणार…

शिक्षकांच्या मागण्या मान्य होण्यासाठी देशव्यापी संप यशस्वी करणार

सिंधुदुर्गनगरी

गुरुवारी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी राज्य व देशभरातील कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विविध मागण्यांकरीता शासनाचे लक्षवेध करण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक संप होत असून देशभरातील सुमारे वीस कोटी कामगार व कर्मचारी मिळून संपावर जाणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा संप यशस्वी करण्याचा निर्धार राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या संप पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन व आढावा बैठकीत करण्यात आला.

सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक पतपेढीच्या शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी सरचिटणीस राजन वालावलकर, राज्य सरकारी निमसरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव सकपाळ, शिक्षक नेते चंद्रकांत अणावकर,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम,नंदकुमार राणे, सचिन मदने, पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख समितीचे जिल्हा सरचिटणीस सुहास सावंत, पतपेढीचे अध्यक्ष तळवणेकर, नामदेव जांभवडेकर,चंद्रसेन पाताडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − one =