You are currently viewing महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे विजेच्या समस्यांची जाणीव करून देणार

महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे विजेच्या समस्यांची जाणीव करून देणार

*गणेशोत्सव पूर्वी वीज ग्राहकांच्या अडचणी न सुटल्यास संघर्षाची भूमिका घेणार*

 

*अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी “प्रकाशगड” येथे करणार*

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिनांक 31/08/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता अधीक्षक अभियंता, MSEB, सिंधुदुर्ग सर्कल, एमआयडीसी, कुडाळ यांना जिल्ह्यातील तमाम वीज ग्राहकांच्या विविध अडचणी, समस्या तसेच सूचना, प्रलंबित मागण्या बाबत लेखी निवेदन देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिडीत तसेच अन्यायग्रस्त वीज ग्राहकांनी आमच्या जिल्हा संघटनेकडे त्यांना होत असलेल्या समस्येबाबत लेखी तक्रारीची प्रत दिल्यास जिल्हा संघटना सतत पाठपुरावा करून जिल्हा वीज प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करेल.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्री. श्रीराम शिरसाट – अध्यक्ष आणि श्री. निखिल नाईक – सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा