दुःख हृदयातलं…

दुःख हृदयातलं…

आज मला..
हसताही येत नाही,
आणि रडताही…
सुखदुःखाच्या आठवणी,
साठवून ठेवताही…

खोटं खोटं हसताना,
मनातलं दुःख…
लपवताही येत नाही.
खुलताना नयन माझे,
जणूकाय माझेच प्रतिबिंब…
कुत्सितपणे…मलाच पाही..

जखम मनाची..
खोलवर झालेली.
अजूनही भरून येत नाही.
सुखाचं मलम लावूनही..
दुःखाचं भळभळणारं,,,,,
रक्त….वाहतच राही.

आज मला…
हसताही येत नाही,
आणि रडताही…!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा