You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

*सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या पुर्वी सुद्धा किशोर तावडे यांनी जिल्ह्यात अ‍ॅडिशनल कलेक्टर म्हणून फार चांगले काम केले आहे आता जिल्हाधिकारी म्हणून आपल्याकडून चांगलेच काम होईल अशा भावना या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख,प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर,कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू,कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा अक्षता खटावकर, कुडाळ नगरपंचायत माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान महिला बालकल्याण सभापतीआफ्रिन करोल इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा