You are currently viewing मालवणात विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका

मालवणात विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका

मालवणात विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका

RRT पथक व ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून बचाव; तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सोडले

मालवण :

बुधवळे मळेशेत परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने धाडसी आणि यशस्वी सुटका केली. स्थानिक ग्रामस्थ राजू मुणगेकर व संदिप बुधवळेकर यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.
वनविभागाचे अधिकारी, जलद बचाव पथक (RRT) आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून बिबट्याला अत्यंत काळजीपूर्वक विहिरीतून बाहेर काढण्यात आले. विशेष पिंजऱ्याच्या साहाय्याने त्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले.
यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याची तपासणी केली असता तो पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे आढळले. त्यामुळे त्याला कोणतीही इजा नसल्याची खात्री झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
हे संपूर्ण बचावकार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश दत्त शर्मा व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वनक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार, वनपाल मालवण सदानंद परब, वनरक्षक अतुल खोत, वाहन चालक राहुल मयेकर तसेच RRT पथकातील अनिल गावडे, दिवाकर बांबरर्डेकर, सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे, संदिप परब यांनी सक्रिय सहभाग घेतला.
तसेच स्थानिक ग्रामस्थ राजू मुणगेकर, अनंत शिर्सेकर, संदिप बुधवळेकर, समीर टेंबुलकर, प्रकाश बिडवलेकर, संदिप कुळेकर (पोलीस पाटील) व बुधवळे येथील ग्रामस्थांनीही बचावकार्यात महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा