You are currently viewing रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली उपवनसंरक्षक शहाजी नारनवार यांची भेट

रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली उपवनसंरक्षक शहाजी नारनवार यांची भेट

कलंबिस्त गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन

कलंबिस्त गावातील शेतकऱ्यांचे गव्यारेडे व वनगाई यांनी भातशेतीचे बरेच नुकसान केलेले असून त्याची पहाणी रेवती राणे यांनी शेताच्या बांधावर जाऊन केली. त्यानंतर आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने समवेत उपवनसंरक्षक शहाजी नारनवार यांची भेट घेऊन प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मान्य केले.

यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा रेवती राणे, अबीद नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश गवस, रिद्धी परब, आर के सावंत, संदीप राणे, बाबू सावंत, दिलीप वरने, कलंबिस्त गावातील शेतकरी चंद्रकांत सावंत, विश्वजित सावंत यावेळी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + fifteen =