You are currently viewing कुडाळ तालुक्यातील आंब्रड विभागातील कुपवडे गावात शिवसेनेला खिंडार..

कुडाळ तालुक्यातील आंब्रड विभागातील कुपवडे गावात शिवसेनेला खिंडार..

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाला असंख्य शिवसेनिकांनचा प्रवेश..

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील आंब्रड विभागातील कुपवडे गावातील शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य किरण सखाराम गावकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी माजी मुख्यमंत्री मान. नारायण राणे यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होत आज कणकवली येथे माजी मुख्यमंत्री मान. नारायण राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला जिल्हाअध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, भाजप जेष्ठ नेते राजू राऊळ ओरोस मंडळ अध्यक्ष गोपाळ हरमलकर, युवा मोर्चा जिल्हा प्रवक्ता दादा साईल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पप्या तवटे, प.स. सदस्य संदेश नाईक, तालुका सरचिटणीस नारायण गावडे, बाळा राणे, आंब्रड विभागिय अध्यक्ष दिलीप तवटे, शक्ती केंद्र प्रमुख अनिल परब, बाबु वरक, रमेश परब, महादेव गावडे, संतोष मेस्त्री, श्रीधर सावंत, दिवाकर परब, संतोष माळकर, बाबू परब आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांचे समर्थक ग्रामपंचायत सदस्य किरण गावकर यांच्या कुपवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपा प्रवेशामुळे आंब्रड विभागात शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे. कुपवडे गावातील प्रवेश कर्त्यांची यादी खालील प्रमाणे:-
किरण सखाराम गावकर,विठ्ठल, सिताराम कदम, वसंत हरी मेस्त्री, सुनिल, अनंत मेस्त्री, देवेंद्र, लवू गावकर, अमोल अंकुश गावकर, सखाराम यशवंत गावकर, राजेश्री सखाराम गावकर, लवू लक्ष्मण गावकर, वैशाली लवू गावकर, संजीवनी अंकुश गावकर, अश्व‍िनी अमोल गावकर, काजल किरण गावकर, रजनी विठ्ठल कदम, मुणाली विठ्ठल कदम, सुनिता, सुनिल मेस्त्री, राोहिनी व‍िश्राम गावकर, निकिता नागेश गावकर, जयश्री धोंडी गावकर, गणेश महादेव गावकर, सृष्टी गणेश गावकर, सुलोचना महादेव गांवकर, वनिता विष्णू गांवकर आदी शिवसेनिकांनी प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − four =