You are currently viewing कुडाळ शहरात विनाकारण करणाऱ्यांचे “थर्मल स्क्रिनिंग”…

कुडाळ शहरात विनाकारण करणाऱ्यांचे “थर्मल स्क्रिनिंग”…

पोलीस व आरोग्य प्रशासनाची मोहिम; कोरोना लक्षणे आढळल्यास “रॅपिड टेस्ट”…

कुडाळ

शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट मोहीम तालुका प्रशासनाने हाती घेतली आहे.दरम्यान प्राथमिक स्वरूपात संबंधितांचे “थर्मल स्क्रिनिंग” करून लक्षणे आढळल्यास त्याची तात्काळ कोरोना तपासणी केली जात आहे.त्यामुळे विनाकारण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अनेक जण माघारी परतत आहेत.
कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शनिवार-रविवारच्या कडकडीत बंद नंतर सोमवारी सकाळी कुडाळ शहरात सुरू असलेली वर्दळ रोखण्यासाठी पोलिसांनी व आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतलीआहे.
पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे,वाहतूक पोलीस संदेश अबीटकर,होमगार्ड यांचे पथक सकाळी ७ वाजल्यापासून एस एन देसाई चौजात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनचालक आणि पादचाऱ्यांना थर्मल स्क्रीनिंगच्या रांगेत उभे करत होते.त्यामुळे शहरातील अनावश्यक वर्दळ कमी होण्यास या मोहिमेची मदत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 8 =