You are currently viewing अखेर असंतोष “स”येकर यांच्या माडीवर बसली गुरुवारी जुगाराची बैठक

अखेर असंतोष “स”येकर यांच्या माडीवर बसली गुरुवारी जुगाराची बैठक

*मालवण, बांदीवडे येथील जुगार खाकी वर्दीला आव्हान*

 

मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील जुगाराची बैठक बंद होण्याचे नाव घेईना. संवाद मीडियाच्या बातमीनंतर बांदीवडे पुलापलीकडील नदी किनाऱ्यावर बसलेली बैठक पोलिसांनी बंद केल्यामुळे नवी जागा कुठे शोधायची या विवंचनेत होती. अखेरीस बैठकीचे मुख्य तक्षिमदार आयोजक “अ”संतोष “स”येकर यांच्या घराच्या माडीवरच बैठक बसली. गुरुवारी रात्री ११.०० वाजता सुरू झालेली बैठक पहाटे ४.०० वाजता बंद झाली.

गुरुवारी रात्री बसलेल्या बैठकीत पहिल्या पटाला तब्बल ७० हजार रुपये बैठक आयोजित करणाऱ्यांना मिळाले तर दुसऱ्या पटला ४० हजार रुपयांचा गल्ला जमा झाला. सयेकर यांच्या माडीवर फॅन आदी व्यवस्था नाही आणि बाहेरून हवा येण्यास वाव नसल्यामुळे जुगाराच्या खेळींना उष्णतेचा त्रास झाला. त्यामुळे घामाघुम झाल्याने अनेक खेळी कंटाळले. घाम गळत असल्याने लक्ष विचलित झाले आणि अनेक जण जुगारात पैसे हरले, त्यामुळे पैसे गेलेले खेळी वैतागलेले दिसत होते. खाकी वर्दीने बांदिवडे नदी काठावरील बैठकीस बंदी केल्याने जागा बदलून बैठक बसत असून खाकी वर्दीलाच जुगार्यांनी आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने जुगारासारखे अवैद्य धंदे जिल्ह्यात वाढीस लागल्याचे दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याकडे गंभीरपूर्व पूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा