You are currently viewing मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री सीमा देव…!

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री सीमा देव…!

 मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अवघ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून सीमा देव अल्झायमर या आजाराशी झुंज देत होत्या. 

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला. सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुलं आहेत. २०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर आज सीमा देव यांचं दीर्घ आजाराने निधन झालं.

सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. ‘आलिया भोगासी’ या सिनेमातून त्यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांंमधून काम केलं. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते. चरित्र अभिनेत्री म्हणून सीमा देव यांनी अनेक हिंदी चित्रपट देखील गाजवले. बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांसह त्यांना बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मीनाकुमारी, अनिल कपूर, गोविंदा, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांसारख्या सर्व पिढीतील कलावंतांसह काम करताना आपल्या भूमिकेशी त्या प्रामाणिक राहिल्या. ‘भाभी की चूडियाँ’, ‘आँचल’, ‘आनंद’, ‘प्रेमपत्र’, ‘मियाँ बीबी राजी’, ‘तकदीर’, ‘हथकडी’, ‘मर्द’ हे सीमा यांचे हिंदी चित्रपट प्रचंड गाजले होते.

अभिनेते रमेश देव यांच्याबरोबर प्रेमविवाह झाल्यानंतर सीमा देव यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेऊन स्वत:ला संसारात गुंतवून घेतले होते. पुढे आई म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत असताना, आयुष्याच्या एका टप्प्यावर चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी चित्रपटांमधून भूमिका करण्यास पुन्हा सुरुवात केली. ‘सर्जा’ या त्यांच्या होम प्रोडक्शनच्या चित्रपटात त्यांनी अजिंक्य देवच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती.

२०१७ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात त्यांना राजा परांजपे प्रतिष्ठानचा “जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला होता. “मोलकरीण” या सिनेमातील “कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर” हे त्यांचं गाणं प्रचंड गाजलं होतं. “आनंद” सिनेमातही रमेश देव आणि सीमा देव या दोघांनी काम केलं होतं. या दोघांची जोडी मराठी सिनेसृष्टीतली एक उत्तम जोडी म्हणून ओळखली जात होती.

 

——————————————————————-

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =