You are currently viewing मोफत शिबिर.. सिंधुदुर्ग वासियांसाठी…

मोफत शिबिर.. सिंधुदुर्ग वासियांसाठी…

सिंधुदुर्ग :

 

एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल हे ‘सेवेचा धर्म मानवतेचा परिसस्पर्श’ या ब्रिद वाक्यानुसार सिंधुदुर्ग वासियांसाठी नेहमीच सेवा शिबिराचे आयोजन करत असते. एस.एस.पी.एम. लाईफटाईम व संस्थापक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार मा. नारायणरावजी राणे यांनी जगातील अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञानासोबत आता संपूर्ण जगात बहुप्रतिष्ठित असे सुविख्यात डॉक्टर यांच्या सेवा सिंधुदुर्ग वासियांसाठी उपलब्ध करवून दिल्या आहेत.

 

याच पार्श्वभूमीनुसार एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल या ठिकाणी मधुमेह तज्ञ आणि थायरॉईड व इतर ग्रंथी तज्ञ यांचे गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी तपासणी आणि उपचार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मा. नारायणरावजी राणे आणि सौ. नीलम राणे या शिबिरावेळी उपस्थित राहणार आहेत.

 

या वेळी सदर शिबिरात डॉ. नासीर फुलारा (एम.डी. (बी.ओ.एम.), एफ.सी.पी.एस (सी. पी. एस.), एम.बी.एफ.सी.पी.एस. (सी.पी.एस.), एफ.आई.सी.ए. (यु.एस.ए.), एफ.ए.एम.एस., एफ.आर.एस.एच. लंडन) यांच्या सहित डॉ. साहिल फुलारा (एम.डी. (बी.ओ.एम.), आर.सी.पी. एन्डो. (यु.के.) डी. डीआईएबी (यु.के.), एफ.ए.सी.इ. (यु.एस.ए.) हे उच्च गुणवत्ता धारक आणि जागतिक स्थरावर वैद्यकीय सेवा बजावलेले तज्ञ डॉक्टर गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १०:०० वा. ते दुपारी ०१:०० वा. एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल येथील सदर शिबिरात आपली सेवा बजावणार आहेत.

सदरच्या या शिबिरात मधुमेह रुग्ण, थायरॉईड ग्रस्त रुग्ण यांची विशेष तपासणी करून एच.बी.ए. १ सी, लिपीड प्रोफाइल, ब्लड शुगर, क्रियाटीनीन, टी३ टी४ टी.एस.एच. (थायरॉइडच्या रक्ततपासण्या) सी.बी.सी. व युरीन या साधारणपणे रु. २०००/- (दोन हजार मात्र) मूल्याच्या लॅब तपासण्या मोफत होणार आहेत.

 

तसेच शिबिरातील काही लॅब चाचण्या या खाण्यापूर्वी केल्या जाणार असून रुग्णांनी १० तास उपाशी पोटी सकाळी ८:०० वा. एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल या ठिकाणी रक्ततपासणी साठी उपस्थिती राहणे गरजेचे आहे. २ तासांनी सकाळी १०:०० वा. पुन्हा रक्त तपासणी केली जाणार आहे. सर्व तपासणी अंती उपलब्ध रिपोर्टच्या आधारे डॉ. फुलारा रुग्णांची तपासणी करून तज्ञ सल्ला देणार आहेत.

 

सदर शिबिरास प्रवेशसंख्या मर्यादित असून प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ५० रुग्णांना संधी देण्यात येणार आहे. तरी मधुमेह आणि थायरॉईड आजार ग्रस्त रुग्णांनी एस.एस.पी.एम. लाईफटाईम  हॉस्पिटल रिसेप्शन येथे संपर्क साधावा ही नम्र विनंती.

 

माहितीसाठी संपर्कसाठी क्रमांक – ०२३६७-२३४००० / सौ. दुर्वा गंगावणे ९३७००५६०७६ किंवा  श्री. अनिल कुडपकर ९४२०९०७६६१ यांच्याशी संपर्क साधावा.

 

सदर क्रमांकांवर बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वा. पर्यंत नावनोंदणी करावयाची आहे. प्रवेश मर्यादित असल्यामुळे आणि तपासणी तपशीलवार व व्यवस्थित होण्यासाठी प्रथम येणाऱ्या ५० रुग्णांचे नाव सदर शिबिरासाठी नोंदवले जाणार आहे.

 

शिबिरास उपस्थित राहणारे डॉक्टर हे सदर वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक स्तरातील तज्ञ असल्यामुळे एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रीटेंडेंट डॉ. आर. एस. कुलकर्णी. आणि येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी सौ. अपूर्वा पडते या  सर्व सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी सदर शिबिरासहित एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − seven =