You are currently viewing स्वातंत्र्य तनाचे,मनाचे आणि देशाचे…

स्वातंत्र्य तनाचे,मनाचे आणि देशाचे…

*वक्रतुंड साहित्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष लेखक जगन्नाथ खराटे लिखित १५ ऑगस्ट२०२३ स्वातंत्र्यदिनानिमित्त लेख*

*स्वातंत्र्य तनाचे,मनाचे आणि देशाचे…*

मनुष्य हा धरतीवर जन्माला यायचं मुख्य कारण म्हणजे जीवाला मिळालेलं स्वातंत्र्य… ह्यांच स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी तो विविध कर्म करतो.फलस्वरुप त्याचे बरेवाईट सुखदुःख भोगतो.. .
तसा, मनुष्य हा आदिमानव कालापासून संगठनप्रिय प्राणी असल्यानें तो एकटा कधीच राहिला नाही, त्याची एकत्र राहण्याची सुरुवात ही जन्माला आल्यानंतर झाली, आई वडिल,भाऊ बहिण नंतर पत्नी,मुलं,नातेवाईक ,समाज, राष्ट्र ,देश अशा पद्धतीने होत गेली समाजाचा एक अविभाज्य घटक बनुन,
जिवन जगु लागला, खरंतर, जिवन जगतांना,संघटन शक्तीमुळे,त्याच्या अस्तित्वाला एक वेगळं स्थान मिळालं अन् अधिकाधिक सुख मिळवण्यासाठी धडपड करु लागला ‌..अन् हे सुख मिळविण्यासाठी मनाच्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याचा विचार न करता, आपनंच सुखी व्हावं ही इच्छा अधिक प्रबळ होत गेली.अन पर्यायाने तो इतरांचही स्वातंत्र्य हिरावुन घेवुन त्यांना दुःखी करु लागला. असं हे अनादी कालापासून सुरु आहे स्वातंत्र्याबद्दलचं हे आकर्षन मात्रं अजुनही कमी झालेलं नाही.किंबहुना स्वातंत्र्य म्हणजे ईश्वराने मानवी जीवनाला दिलेलं एकमेव असं दैवी वरदानआहे..
अगदी पुरातंन काळापासून जो तो प्राणी,अथवा मनुष्य हा दैवजांत मिळालेल्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी लढंत आलेला आहे..अन् अजुनही ती लढाई सुरू आहे..
साधारणपणे, स्वातंत्र्यासाठी प्रत्येक काळात मानवाला संघर्ष करावा लागला हे कटु सत्य आहे,..

जगांत कुठेही गेलं तरी एकंच गोष्ट लक्षात येते की तिथे कधीतरी मनुष्याला जन्मजांत मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला आहे, ह्यामध्ये आपली मातुभुमी भारतदेशसुद्धा येतो..
मुघलांच्या गुलामगिरींत असलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी राजे अगदी बालपणापासून लढले.. त्यांच्या अगम्य अशा दैवी मनोबल दुर्दम्य इच्छाशक्ती, संघटन कौशल्य,युद्धनिती, गणिमीकावा, समिजहीत अथवा देशप्रेम ह्यामुळे महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले,..
पन् आपल्यांच समाजातील काही दुष्प्रवृत्तीच्या फितुरीला बळी पडुन पुन्हा देशावर इंग्रजांचे राज्य आले आणि पुन्हा देश गुलामगिरींच्या बेडीत अडकला..
दिडशे वर्षाच्या गुलामगिरीत
अडकलेला देश पुन्हा,अनेक देशभक्तांच्या त्याग, बलिदान आणि देशभक्तीमुळे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले,,

आपला देश१५अॉगस्ट१९४७ रोजी स्वतंत्र झाला,.अशा ह्या ७६वा स्वतंत्रता दिवसाच्या अनुषंगाने या विषयावर आज बरंच काही लिहावसं वाटतं..

गतवर्षीच आपण स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष खूप धुमधडाक्यात साजरं करुन विविध कार्यक्रमाचे केले होते. अन् हा सोहळा संपुर्ण भारतभर साजरा झाला.
मोठमोठी भाषणे,आवेदने, आश्वासनं,योजना ह्यांच्या घोषनांचे वारे विविध व्रुत्तप्रत्र, न्यूजचैनल आणि अनेक प्रसिद्ध माध्यमातून भरभरुन वाहु लागले होते.सर्व सोशल मिडीया,घोषणांनी सुविचारां नी भरुन गेले होते,प्रत्येकाचं मन देशप्रेमाने ओथंबुन गेलं होते, प्रत्येक व्यक्ती अशा आनंदात होती की भारत देश आता मुक्त झाला अन् आता जगाच्या नकाशावर आपलं नावं वरच्या नंबरवर जाणार असं वाटलं.!!
हे मात्रं खरं की,आपल्या सरकारने,देशाच्या विकासासाठी सरकारने खूप प्रयत्न केले. नवीन योजनांमधून महिलांनपासून तर अगदी कष्टकरी वर्गापर्यंत सर्वांना दिलासा देणाऱ्या ठरतं होत्या …
पन् आज मात्रं मला वाटतं की, सरकार योजना करते सोयी करते, पण आपण सारेजन किती पालन करतो?

खरंतर, मनुष्याची
एक आई,आपली जन्मदात्री दुसरी धरणी माता,तिसरी भारतमाता,भारतदैश!!!
पन् आपन तिसऱ्या मातेसाठी भारतदेशासाठी आपण काय करायला पाहिजे?. देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करायला हवं..
कारणं,आपल्या देशात अनेक सत्ता आल्या अन् त्यांनी आपल्या देशावर राज्य केले.मुघलांनी केलेल्या अत्याचारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका केल्याने भारताच्या हिंदू संस्कृतीचे रक्षण होवुन गोब्राम्हणाचे, स्रीयांचे रक्षण झाले..
नंतर इंग्रजांनी आपल्यावर दिडशे वर्षं राज्य करुन प्रजेला सळोकीपळो करुन सोडले. अशावेळी सर्व देशभक्त जनता, संघटीत झाली , देशभक्तांमध्ये स्वातंत्रवीर सावरकर,लोकमान्य टिळक, सरदार पटेल,म.गांधी , अरुणाअसफली,सरोजिनी नायडू यांच्यासारख्या कितीतरी स्वातंत्र्य सेनानी आणि राजगुरू, सुखदेव, मुंडा,यांच्या सारख्या कितीतरी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले.आपला देश स्वतंत्र व्हावा अशी त्यांची आत्यंतिक तळमळ होती!..

देश स्वतंत्र झाला.अन आपन मोकळा श्वास घेऊ लागलो.. पन्,आजची परिस्थिती पाहता असं लक्षात येतं की आपन खरंच स्वतंत्र झालो का??.. वरवर पाहता आज आपल्या देशाची प्रगती झालेली दिसते, पन् जेव्हा वृत्तपत्रांत बातम्या वाचतो, न्युजचेनलवर बातम्या पाहतो तेव्हा देशाची परिस्थिती तेवढी सुखावह वाटंत नाही..

देशाची,यांत्रिक प्रगती झाली हे अगदी मान्य आहे पन्, जिथे शंभर मानसाचं काम यंत्रामुळे दहा मानसं करु लागले म्हणजे मनुष्यबळ कमी झालं आणि रोजगार कमी होऊन बेकारी वाढली.. सुशिक्षित बेकारी वाढली, उद्योग धंद्यात स्पर्धा वाढल्या, अन् सुशिक्षितांची संख्या वाढत जाऊन ही नोकरी अभावी सुशिक्षित बेरोजगारी वाढली.

पुरोगामी विचारांच्या आपल्या देशांत खूप मोठा समाज मागासलेलाअजुनही आहे.. स्वच्छता, कर्तव्याची जाणीव ह्यासंबंधी.अजूनही आपण मागेच आहोत, कारण अंधश्रद्धा,मागासलेपण निरक्षरता,समाजाप्रति अनास्था,दिसुन येते अशां साठी,सुशिक्षित लोकांनी जागरुक होउन त्यांना निरनिराळ्या पद्धतीने त्यांना शिकवायला हव. तर असा सुजान नागरिक देशाप्रती कर्तव्य भावनेनं समाजसेवी कार्य करेल..
आपल्या कुटुंबासाठी आपन जेवढं तनमनधनाने कार्यरत असतो त्याप्रमाणे देशाप्रती काही कर्तव्ये आहेत ती मनापासून आपन केली पाहिजे.

निसर्ग संपत्तीचा ऱ्हास हा वाचवला. पाहिजे. सतं तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार,”वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”
“वृक्ष आपले मित्र”हे घोषवाक्य, हे सारं मोठ्यानं म्हणत पर्यावरणदिन साजरा करतो पन् खरं नंतर तसं वागताना दिसत नाही. सर्वं चित्र वेगळचं असतं..
निसर्गाचे संवर्धन आपण इतक्या काळजीने उत्साहाने करतो का?ह्याचा मनात विचार करुन, खरंच निसर्गाने कितीतरी गोष्टी आपल्याला मुक्तहस्ते दिल्या आहेत,ज्यात मोठमोठे डोंगर, नद्या,सरोवर,सागर,वृक्ष,धबबधबे,बर्फाचे पर्वत ह्या सर्वांचंच संवर्धन करायला हवं. पन् आपन त्याचा दुरुपयोग करुंन नाश करतो हे कितपत योग्य आहे?

आपली नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्यासाठी वृक्षतोड थांबवली पाहिजे.
उगाच टोलेजंग इमारतीसाठी जंगलतोड करणे,वृक्षतोड हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे जंगलातल्या निसर्ग संपत्तीचा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद भावी पिढीला मिळायला हवा, त्यासाठी जगलं जपायला हवी..

मानसांचं जिवन म्हणजेपाणी, जीवनात पाणी किती आवश्यक आहे हे सर्वांनाच माहीत आहे, सद्ध्या जलसंवर्धनासाठी खूप प्रयत्न होतांना दिसतांत.
“पाणी जिरवा पाणी वाचवा”
हा नारा देण्यापेक्षा पाणी वाचविण्यासाठी सर्वांनींच जागृत व्हायला पाहिजे, अन् ही सर्वांची जबाबदारी आहे.पाणी नासाडी करणे हे चुकीचे आहे.आज आपणचं पाणी नीट वापरलं नाही तर पुढच्या पिढी जगेल कशी ?तसंही पाण्याची पातळी कमी होत चालली आहे.आता खूप कमी पाऊस झाला ह्याला कारण वृक्षतोड .. अन् त्यामुळे वृक्षसंवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच पाणीगळती, पाणी नासाडी थांबवली पाहिजे, खरं तर जेवढं लागेल तेवढं पाणी वापरलं पाहिज. पाण्याची बचत ही अत्यंत महत्त्वाचे आहे..
दुसरं म्हणजे पर्यटन.. पर्यटनासाठी जातो तेव्हा समुद्र किनारा असो अथवा निसर्गाच्या सान्निध्यात डोगरदर्या असो अथवा, किल्ले, किंवा मंदिर असो..तेव्हा नेहमीच एक दृष्य पाहतो प्लॅस्टिक कचर्याचा ढीग, प्लॅस्टिक कचरा हे सारं निसर्गाचं सौंदर्य नष्ट करीत असते.आपणच जर असं केलं तर लहान मुलांसमोर काय आदर्श राहील.? या बाबतीत जागरुक राहून लोकांना समज द्यायला हवं. एक सुजाण नागरिक म्हणून आपणचं हे केलं तर काय हरकत आहे? निसर्गाचे सौंदर्य टिकवून ठेवणे आपल्याच हाती आहे..
“स्वच्छ भारत अभियान”हे आपल्यापासुन‌ सुरु व्हायला हवं..
.

आपल्या देशातील दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे, भ्रष्टाचार!!
भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट अशी वागणुक.आज सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार अगदी लपुनछपून हा होंतंच असतो..ज्याला आळा घालणं एकट्याचं काम नाही.. हे सर्वांचंच काम आहे.छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण लाच देतो, ती सुरुवात आपणच करतो.. कारण साध्यासुध्या कामासाठी सरकारदरबारी आपल्याला सतरा चकरा माराव्या लागतात.. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होतो.काम लवकर व्हायला पाहिजे,मग ह्यातुन भ्रष्टाचाराचा उगम होतो..
ह्यासाठी सरकारी यंत्रणेवर कायद्याचं,कडक नियंत्रण असायला हवं.वेळच्या वेळी लोकांची कामे विनासायास, विनामूल्य व्हायला हवी.. पन् तसं होत नाही..
शिक्षणासारख्या पवित्र मंदिरात सुद्धा तर आज भयानक भ्रष्टाचार बोकाळला आहे ही फार वाईट गोष्ट आहे..
सरकारी कायदे,नियम आपण प्रामाणिकपणे पाळले पाहिजे कायदे नियम हे जनतेसाठी जनतेच्या हितासाठी केलेले असतात तसेच ते सरकारी अधिकार्यासाठी सुद्धा आहेत..पण तेच नियम आपण सर्वजंन सर्रास तोडतो.,,या सर्व गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात.
हल्लीच्या राजकारणात तर नुसता अंदाधुंदी कारभार दिसंत आहे. आपण आपली सद्सदविवेकबुदधी जागृत ठेवून मतदान केले पाहिजे आणि योग्य शिक्षित उमेदवारांची निवड केली तरचं देशाच्या प्रगतीत आपणही खारीचा वाटा उचलण्याचे समाधान मिळेल.नेता अशिक्षित,अन् भ्रष्टाचारी असा अयोग्य असेल तर देशाची प्रगती कशी होईल? पण सद्ध्या नुसतेचं पैसे खाऊन नेत्यांनी देश पोखरला गेला तर आपणच त्याला जबाबदार आहोत.. कारण योग्य नेतृत्व निवडलं नाही. ह्यासाठी योग्य मतदानानेच देश सुधरेल…

खरंतर, देशाप्रती जर आपणचं जागरूक झालो तर नवीन पिढी जागरुक होइल.आपल्या देशातील परिस्थितीला खरं तर नवीन पिढी कंटाळली आहे.सारेंच एकाच माळेचे मणी आहे ह्यासाठी सुशिक्षितांनी पुढे यायला हवं.. कारण आपल्या देशाची परिस्थितीसाठी थोडेफार आपणसुद्धा जबाबदार आहोत…
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगावसं वाटतं की देशभक्तांच्या त्याग बलिदान आणि देशप्रेमाने मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी आपन त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत.अन हे स्वातंत्र्य रक्षणासाठी आपन सदैव जागरुक राहून ते प्रतिदिन वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपंन, सर्व देशभक्तांच्या बलिदानाला मानाचा मुजरा करायला हवां..

जगन्नाथ खराटे.ठाणे..
१५अॉगष्ट २०२३

*संवाद मिडिया*

*प्रवेश सुरू..प्रवेश सुरू.. 2023 – 2024*🏃‍♂️🏃‍♀️

*पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी…*

*डॉ. आठवले कॅम्पस*

🩸 *D.M.F Paramedical Institute-DEVGAD*🩸

*_कॅम्पस कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने खालील कोर्सेस उपलब्ध_*

*_♻️कोणत्याही शाखेच्या बारावी पास विद्यार्थ्यांसाठी_*♻️
🔹 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री

*♻️दहावी पास विद्यार्थ्यांसाठी♻️*
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन डायलिसिस टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑप्टोमट्री

*✅कोर्सचा कालावधी १ वर्ष* 1️⃣

*🔰आवश्यक कागदपत्रे 🔰*
💠लिव्हिंग सर्टिफिकेट
💠 दहावी व बारावी पास माार्कलिस्ट
💠दोन आयकार्ड साईज फोटो
💠आधार कार्ड झेरॉक्स

*🏬सुसज्य अत्याधुनिक लायब्ररी*
*🔬आधुनिक डायरेक्ट डिजिटल एक्स-रे प्रणाली*
*🕴️उच्चशिक्षित प्रशिक्षक*
*📚डिजिटल लायब्ररी*

*💸’हप्त्याने फी भरण्याची सोय*

*संपर्क*👇
*देवगड मेडिकल फाउंडेशन*
*📲 7382821000*
*📲 7382822000*

*⏰सकाळी 9 ते 12 वा. | दुपारी 3 ते 6 वा*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/105854/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा