You are currently viewing वाट बिकट वैधव्य

वाट बिकट वैधव्य

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. महाराष्ट्र रणरागिनी साहित्य कुंज समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.किरण (करामोरे) चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना

चुड्यात हिरव्या हळदीने माखली गुलाबी गाली
काळा धागा गळी बांधुनी तुझीच सजना झाली
साक्षी अग्नी सभोवताली सात फिरूनी फेरे
सखयासंगे नाते जुळले हृदय मानसी वेडे

ओलांडत ती माप सासरी सुखात नांदे जोडी
उंच भरारी घेउ लागली ती ही थोडी थोडी
दोन घराणी ऋणानुबंधे परस्परांशी जुळली
जोडीदारा संगे हिरवळ संसार फुले फुलली

दृष्ट कुणाची संसाराला,लागुन कुंकू गेले
सरणासंगे विलीन झाले परत कधी ना आले
बिकट वैधव्य कठीण भारी नशिबी होते झाले
एकल होता ओठ बोलके ,अबोल आता झाले

उंबरठा ना ओलांडीला पाऊलांनी केव्हा
लेकरासवे अंत करावा विचार येई तेव्हा
मिळे नराधम जागोजागी दिसती नजरा पापी
पुरुषप्रधानी पुरुषत्वाची संस्कृती दिसे कापी

सोपे नाही देह रक्षणे वाटा अवघड नारी
सजना जाता सासर लोका सुनही होई परकी
हक्क मागणी भीती पोटी सासर नाते तुटले
वंश संतती नातू वृद्धी,सासुरवाडी ढकले

मेल्यासंगे कुणी न जाती विश्वरचेता संगी
सबला व्हावे ना तू अबला लेकरे तुझी रेंगी
पतीस गिळले दुनिया बोले लक्ष न द्यावे आता
स्वतः जगावे,निर्भय व्हावे पुढे मोकळ्या वाटा

किरण चौधरी
गडचिरोली

प्रतिक्रिया व्यक्त करा