You are currently viewing आडारी-खैदा रस्त्यावर एसटी बसची पिकअप गाडीला धडक…

आडारी-खैदा रस्त्यावर एसटी बसची पिकअप गाडीला धडक…

आडारी-खैदा रस्त्यावर एसटी बसची पिकअप गाडीला धडक…

दोन्ही गाड्यांमधील ११ जण किरकोळ जखमी ; अपघातात गाड्यांचे नुकसान…

मालवण

मालवण -बेळणे मार्गावरील आडारी ते खैदा या चढाव व उताराच्या रस्त्यावर कणकवलीहुन मालवणच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने तीव्र उताराच्या वळणावर समोरून येणाऱ्या पीकअप गाडीला धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना काल सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन बस मधील सात प्रवासी तर पीकअप गाडीतील चालकासह चार जण असे एकूण ११ जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान या प्रकरणी हयगयीने वाहन चालवून अपघातास व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बस चालक संजय रामदास भिलवडकर (वय ४४, रा. सोमवार पेठ मालवण) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- येथील एसटी आगारातील मालवण- असगणी- कणकवली ही बस काल  सकाळी सव्वा सहा वाजता सुटून कणकवली तेथे पोहचल्यावर कणकवली येथून साडे आठ वाजता पुन्हा मालवणकडे येण्यास निघाली. ही बस खैदा व आडारी दरम्यान उताराच्या व वळणाच्या रस्त्यावरून मालवणच्या दिशेने येत असतानाच पावणे दहा वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या शहरातील व्यावसायिक अमेय आनंद देसाई यांच्या ताब्यातील पीकअप (एम एच ०७ पी ०८१७) गाडीला बसने धडक दिली. या धडकेत एसटी बससह पीकअप गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. बस मधील जयश्री नारायण गावकर, राजदेव मकडू विश्वाकर्मा, बाळकृष्ण नारायण घाडी, लाडोबा बाळकृष्ण परब, नारायण गंगाराम गावकर, आरती आनंद हडकर, सखुबाई सखाराम धुरी या प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. तसेच पीकअप मधील चालक अमेय देसाई यांच्यासह शशिकांत झिलू लुडबे, हौसराज नीलकंठ पारकर, विकास तुकाजी चव्हाण यांनाही किरकोळ दुखापत झाली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा