You are currently viewing कुडाळ मालवणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

कुडाळ मालवणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

*शिवजयंती उत्सवांना आ. वैभव नाईक यांची भेट*

 

कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यामध्ये मालवण तालुक्यातील आचरा, त्रिंबक, मालडी, बुधवळे, निरोम त्याचबरोबर कुडाळ शहरातील माटेवाडा, नाबरवाडी येथील स्थानिक मंडळांच्या व शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना आणि कुडाळ जिजामाता चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाला आ. वैभव नाईक यांनी भेट दिली यावेळी ठिकठिकाणी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून कुडाळ व मालवण मध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =