You are currently viewing निर्वस्त्र

निर्वस्त्र

*लेखिका मेल्सीना तुस्कानो परेरा, विरार लिखित वास्तव्यावर भाष्य करणारा जळजळीत लेख*

 

*निर्वस्त्र*

 

जे झालं आहे आणि जे होत आहे ते पूर्णपणे लाजिरवाणे आणि क्रूरपणाचे आहे. फक्त त्यामुळे आम्हा स्त्रियांच्याच नाहीत तर पुरूषांच्या माना सुद्धा शरमेने खाली गेल्या आहेत. आम्ही सुद्धा स्त्रीया आहोत. त्यांना विवस्त्र करून जगातील प्रत्येक स्त्रीला या क्रूर पशूंनी निर्वस्त्र केले आहे.

कितीही मोर्चे काढा, मेणबत्त्या पेटवा, की आंदोलनं करा काय फरक पडणार?? स्त्रियांच्या देहाची विटंबना तर झालीच ना?? तिचा देह विवस्त्र करून तिच्या अब्रूच्या चिंध्या उडवल्याच ना??

आज फक्त मणिपुरच्या नाहीत तर संपूर्ण जगातील स्त्रियांवर अत्याचार झाला आहे. ज्या शरीरावर साजशृंगार असावा, त्या शरीरावर एकही वस्त्र नसावे??? किती हा अमानवी राक्षसीपणा???

आणि तो फक्त जगाच्या दौऱ्यावर फिरत असतो. त्याच्या नावाने अख्खा देश बोंबलत आहे, त्याला शिव्याशाप देत आहेत, पत्र, लेख लिहित आहेत, व्हिडीओ बनवत आहेत. पण त्याला काय फरक पडतोय?? तो काही त्या क्रूरतेला थांबवणार नाही आणि नाही कोणतीच शिक्षा देणार. ह्या लांगुलचालन करणार्‍या प्रसारमाध्यमांनी त्याला चढवून ठेवलंय, अंधभक्तांनी डोळे झाकले आहेत, ह्याला प्रजेची काळजी आहे का??

ह्याच्या जाळ्यात अडकून लोक मरणार, स्त्रिया अश्याच अत्याचाराला बळी पडणार आणि लोक फक्त मेणबत्ती, झेंडे घेऊन मोर्चेच काढत राहणार.

अजून किती वर्षे बेटी बचावचा नारा द्यायचा? अजून किती वर्षे मोर्चे काढत राहणार?? यातून साध्य तरी काही होते काय?? फक्त न्यूज वाहिन्यांवर प्रसिद्धी, वर्तमानपत्रांमधून बातमी आणि समाजमाध्यमांतून लेख फिरतात. असं दाखवत आहेत, यांना देशाची आणि नागरिकांची किती काळजी आहे. दरवर्षी अशाच काही क्रूर गोष्टी घडतात, आणि दर वर्षी असे मोर्चे निघतात. पण देशातल्या नागरिकांना फायदा काहीच नाही, फक्त असतो सगळा त्याचा दिखावा..

कारण यातून गुन्हेगारांना शिक्षा हित नाही, आणि तो काहीच करत नाही. करायचं असतं ना तर कधीच केलं असतं आणि मुली वाचल्या असत्या. आपल्या देशातील मुलींच्या शरीराला तर कुकरमध्ये सुद्धा शिजवलं गेलं. अश्या क्रूर आणि स्वार्थी नेतृत्वाखाली देश जगत आहेत. पशुपक्ष्यांहूनही वाईट जीवन जगत आहे आणि त्याहूनही वाईट मरण त्यांच्या वाट्याला येत आहे…

यापुढची परिस्थिती खरंच अत्यंत गंभीर आणि बिकट आहे.

 

*©मेल्सीना तुस्कानो परेरा, विरार*

प्रतिक्रिया व्यक्त करा