You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये 13 ऑगस्ट रोजी संस्थापक दिन

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये 13 ऑगस्ट रोजी संस्थापक दिन

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत श्री पंचम खेमराज महाविद्यालयय सावंतवाडी
येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांची 96 वी जयंती रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयामध्ये “संस्थापक दिन” म्हणून साजरी केली जाणार आहे.
या ‘संस्थापक दिन’ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले हे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. केशव तुपे ,सहसंचालक उच्चशिक्षण, कोकण विभाग, पनवेल हे उपस्थित राहून “उच्च शिक्षण सद्यस्थिती आणि आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास अगत्यपूर्वक उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − thirteen =