You are currently viewing अध्यापक मंडळाची गणित संबोध परीक्षा सुरळीत पार

अध्यापक मंडळाची गणित संबोध परीक्षा सुरळीत पार

बांदा

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी गणित संबोध परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरळीत पार पडली.
विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पना कितपत समजलल्या आहेत याची माहिती या संबोध परीक्षेच्या माध्यमातून होते. दरवर्षी ही परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी इयत्तेसाठी घेतली जाते. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होऊ शकली नव्हती.म्हणून यावर्षी ५वी व ६वी तसेच ८वी व ९वी इयत्तांसाठी ही परीक्षा आयोजित केली होती.
बांदा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत या परीक्षेला पाचवी व सहावी इयत्तांमधून ५५विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सरोज नाईक ,उपशिक्षक रंगनाथ परब व श्री जे.डी .पाटील यांनी परीश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा