You are currently viewing सावंतवाडी चे माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांना आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी चे माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांना आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी चे माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांना कर्नाटक राज्यात आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कर्नाटक राज्यातील बेळगाव यांच्यातर्फे देण्यात येणारा आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांना खासदार अमरसिंह पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर चिक्कोडी, ब्रिगेडियर सुधीर सावंत, कोल्हापूर महानगरपालिका माजी महापौर राजू शिंगाडे,कर्नाटक पोलीस प्रमुख महेश मेगन्यावर, अरविंद घट्टी आदी उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे आपल्याला प्रेरणा व प्रोत्साहन मिळणार असून आपल्या हातून सर्वांगीण विकासाचे कार्य घडेल आणि उत्तरोत्तर असेच कार्य घडो अशी सदिच्छा या पुरस्कार सोहळ्यामध्ये मान्यवरांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 2 =