You are currently viewing मालवणात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २५ जुलै ला छत्री मोर्चाचे आयोजन…

मालवणात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २५ जुलै ला छत्री मोर्चाचे आयोजन…

मालवण

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि अंगणवाडी कर्मचारी यांना सरकारी नोकरीत कायम करावे. या प्रमुख मागण्यांसाठी २५ जुलै रोजी दुपारी १ वाजता येथील बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यावतीने देण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यावतीने विशाखा कुबल, नम्रता भगत, मधुरा रांगणेकर यांनी छत्री मोर्चा बाबत बालविकास प्रकल्प अधिकारी व मालवण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
छत्री मोर्चा दरम्यान प्रकल्प कार्यालयात जमल्यानंतर घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा