You are currently viewing “HAPPAY” या बहुराष्ट्रीय संस्थेकडून डॉ.शैलजा करोडे “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित

“HAPPAY” या बहुराष्ट्रीय संस्थेकडून डॉ.शैलजा करोडे “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित

 

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे यांना HAPPAY या बहुराष्ट्रीय संस्थेद्वारे “लीड – हर – शिप” या कार्यक्रमाच्या अंतर्गत जीवन गौरव (lifetime achievement award) पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरणाच्या वेळी उपस्थित सर्व साहित्यिक, साहित्य रसिकांनी “उभे राहून अभिवादन” (standing ovation) केलं. या पुरस्काराच्या वेळी भारावलेल्या ज्येष्ठ कवयित्री डॉ.शैलजा करोडे यांनी प्रतिक्रिया देताना “कवितेने माका भरपूर दिलंय, आणखी काय हवं..?” अशी भावूक प्रतिक्रिया दिली.

डॉ.शैलजा करोडे या ज्येष्ठ साहित्यिक असून जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, त्याचबरोबर इतरही बऱ्याच साहित्यिक समुहांवर सातत्याने लिखाण करत आहेत..

प्रतिक्रिया व्यक्त करा