You are currently viewing संजीवनी पब्लिकेशनच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

संजीवनी पब्लिकेशनच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

संजीवनी पब्लिकेशनच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील ज्ञानोदय बुक सेलर्स,संजीवनी पब्लिकेशन यांच्या वतीने वेद व अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे , शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उर्मिला खोत ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र घोडके ,माई बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.शैला कांबरे यांच्या हस्ते व संजीवनी पब्लिकेशनच्या संचालिका व लेखिका सौ.नीता बन्ने यांच्यासह
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात किरण बन्ने यांनी ज्ञानोदय बुक सेलर्स,संजीवनी पब्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच ज्ञानोदय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी संजीवनी प्रज्ञा शोध परीक्षा सुरु करत असल्याचे जाहीर केले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वेद व अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.तसेच विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून
पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी संजीवनी मार्गदर्शक व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस प्रश्नसंच पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ.सपना आवाडे , पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी ज्ञानोदय बुक सेलर्स व संजीवनी पब्लिकेशनचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा सुरु असलेला प्रयत्न अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून यातून चांगले विद्यार्थी घडून ते देशाच्या विकासात मोठे योगदान देतील,असा विश्वास व्यक्त केला.तसेच पालकांनी आपल्या पाल्यांच्या जडणघडणीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन केले.यावेळी माधव विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती शिंदे , अनंतराव भिडे विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका बारगीर मॅडम, गंगामाई विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सोनवणे मॅडम, समर्थ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका चौगुले मॅडम,विकास विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सपना मेळवंकी , डीकेटीई नारायण मळा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका उज्वला पाटील , ना.बा. विद्या मंदिरच्या पवार मॅडम यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ,शिक्षक ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.श्वेता कचरे व आभार प्रदर्शन सौ.प्रतिभा बोळाज यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा