You are currently viewing मालवण नगरपरिषदेच्या वेलकाढू धोरणा विरोधात स्वातंत्र्यदिनी उपोषण

मालवण नगरपरिषदेच्या वेलकाढू धोरणा विरोधात स्वातंत्र्यदिनी उपोषण

विहिरीशेजारील शौचालयाचे बांधकाम हटवण्याची श्रीकांत गिरकर यांची मागणी

मालवण

आपल्या विहिरीलगत उभारण्यात आलेले अवैध शौचालयाचे बांधकाम काढून टाकण्यास मालवण नगरपालिकेकडून हेतुपुरस्सर दिरंगाई होत असल्याचा आरोप करत या निषेधार्थ मालवण शहरातील दांडी आवारवाडी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीकांत गिरकर यांनी १५ ऑगस्टला नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

श्रीकांत गिरकर यांच्या विहिरीच्या बाजूला उभारलेले शौचालयाचे अवैध बांधकाम तोडले जावे, यासाठी दहा वर्षे गिरकर यांचा शासन दरबारी पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु नगरपालिकेकडून कुठलीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ८२ वर्षीय गिरकर यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. वारंवार सरकार दरबारी चकरा मारूनही न्याय का मिळत नाही, असा सवाल गिरकर यांनी केला असून उपोषणादरम्यान आपल्याला काही शारीरिक त्रास झाल्यास त्याला केवळ मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा