“जयवंता,खूप घाई केलीस मित्रा,….”

“जयवंता,खूप घाई केलीस मित्रा,….”

“जयवंता,खूप घाई केलीस मित्रा,….”
या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी सतत विचार करणारे,छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी तळमळीने मांडणारे सावंतवाडी शहरातील एक व्यापारी संघाचे पदाधिकारी ही जयवंत कुलकर्णी ही त्यांची ओळख असली तरी एक कुटुंब वत्सल, सतत हसतमुख आणि प्रेमाने माणसं जोडणारा एक जीवलग मित्र ही दुसरी ओळख.
१९८१/८२ या काळात पंचम खेमराज महाविद्यालयात जे आमचे काही मोजकेच मित्र होते त्यापैकी जयंत हा एक मित्र होता.वाणीज्य शाखेचा विद्यार्थी, घरच्या सधन आर्थिक परिस्थितीचा कधीच मोठेपणा नाही त्यामुळे माझ्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांलाही अतिशय सन्मानाने वागवत असे. संपूर्ण कुलकर्णी घराण्याचेच त्यांचे संस्कार. काँलेजच्या कँन्टीनमध्ये खांद्यावर हात घालून चहा पिण्यासाठी नेणारा जयंत,लेक्चर आँफ असला की तोतापुरी आंब्याच्या झाडाखाली गप्पा मारणारा हा आमचा मित्र…एक नाही अनेक आठवणी आहेत.
मी १९८५ मध्ये जो महाविद्यालयाचा विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्यामध्ये माझ्या या मित्राचा मोलाचा वाटा होता.. अवघ्या एका मताने निसटता विजय झाला तेव्हा कँन्टीनमध्ये आनंदाने सगळ्याना पार्टी देणारा जयंत,१९८४मध्ये स्व.इंदिरा गांधीचा खून झाला तेव्हा त्यावेळच्या देशातील परिस्थिती लाईव्ह पहाता यावी म्हणून त्यांच्या घरी आम्ही तासनतास टी.व्ही. समोर बसत असू…तेव्हा अगदी अदबीने खुर्ची देणारा जयंत….
अनेकदा खरेदी निमित्ताने दुकानात जायचो..पण निदान पंधरा वीस मिनिटं गप्पा मारल्याशिवाय माझी खरेदी होत नसे. हल्ली या कोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने जयंताची भेट नाही.. आणि आज ही दुर्दैवी बातमी ऐकायला मिळाली.. सतत हसतमुख.. कुणाबद्दल आकस नाही.. तिखट प्रतिक्रिया नाहीत… पण एखाद्या विषयाची संयमीत आणि वास्तव मांडणी करण्याचा हातखंडा…
खरचं अशा मित्राला या पध्दतीने एवढ्या लवकर भावपूर्ण श्रध्दांजली हे शब्द लिहितानाही हात थरथरतं आहेत…पण दैवदुर्विलास… वास्तव स्विकारावचं लागेल..
…पण मित्रा..जयंता तू खूप म्हणजे खूपचं घाई केलीस…सगळाचं डाव अर्ध्यावर सोडलासं..
…ओमशांती..
तुझाच शोकाकुल मित्र…
… अँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा