You are currently viewing सौदाळे विद्यालयाच्या ११४ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

सौदाळे विद्यालयाच्या ११४ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

देवगड

माध्यमिक विदयामंदिर सौदाळे विदयालयात विदयार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप माध्यमिक विदयामंदिर सौंदाळे या प्रशालेतील ११४ विदयार्थ्यांना प्रत्येकी एक डझन वहया ,कंपासबॉक्स,पॅड,वॉटरबँग अशा शालोपयोगी साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सदर साहित्य हे शाळा संस्थेचे मुंबईस्थित सदस्य् रविंद्रजी पेडणेकर (राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू) यांच्या अथक प्रयत्नांतून देणगीदार विरजली शहा,चार्टर्ड अकौंटट यांचेकडून प्राप्त झाले असून गेले ७ ते ८ वर्षे रविंद्रजी पेडणेकर यांच्या प्रयत्नांतून अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य प्रशालेतील सर्व विदयार्थ्यांना मोफत उपलब्ध करुन दिले जात आहे.
या कार्यक्रमाच्यावेळी संस्था सदस्य् महेश मोंडे,खजिनदार रमाकांत राणे,शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष विष्णू राणे, विदयमान उपाध्यक्ष संतोष गुरव,प्रशालेचे मुख्याध्यापक गणेश रानडे या मान्यवरांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे विदयार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी सर्व मान्यवरांनी देणगीदार विरजली शहा व रविंद्रजी पेडणेकर यांनी केलेल्या सहकार्याबददल आभार मानले. या कार्यक्रमाला प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैजनाथ कदम तर आभार प्रसाद परब यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 11 =