अखिल भारतीय शिक्षक संघ आयोजित कॅलीग्रफी, फोटोग्रफी व कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर….

अखिल भारतीय शिक्षक संघ आयोजित कॅलीग्रफी, फोटोग्रफी व कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर….

रामा पोळजी, वसुंधरा सुर्वे, सुनिता आजगावकर प्रथम

तळेरे

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ले संघटनेने शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

कविता लेखन स्पर्धेत रामा पोळजी (उभादांडा नवाबाग)- प्रथम, सरोज जानकर(पाल गोडावणे) व तन्वी बांदीवडेकर – द्वितीय, ईश्वर थडके(आसोली सखेलेखोल) व सुनिल गोंधळी(वायंगणी नं.१- तृतीय, संजय परब(वजराट नं.१), माधव ठाकरे( पेंडूर नाईकवाडा), विकास आडे(प्रताप पंडीत)- उत्तेजनार्थ
कॅलीग्राफी स्पर्धा – वसुंधरा सुर्वे(वजराट नं.१)- प्रथम, सुजाता देसाई(आसोली फणसखोल)-द्वीतीय, शालीक पाटील(परूळे नं.३) व तेजश्री जावळे(आसोली सक्राळ)- तृतीय, समीर चव्हाण(परुळे नं.३) व अमोल दामोदर(पिंपळाचे भरड) – उत्तेजनार्थ
फोटोग्राफी स्पर्धा -सुनिता आजगावकर(रेडी सुकाळभाट -प्रथम, संजीवणी ढास(पाल गोडावणे) -द्वितीय, चंद्रकांत गवळी( होडावडे भोज) -तृतीय, प्रशांत चिपकर(दाभोली नं.१) व धनंजय गुंजाळ( परूळे नं.१) उत्तेजनार्थ.
शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांना शिक्षकांमधून उत्स्फुर्त सहभाग लाभला. कविता लेखन स्पर्धेचे परीक्षण लेखक व कवी वीरधवल परब यांनी केले. कॅलीग्राफी स्पर्धेचे परीक्षण जितेंद्र पेडणेकर यांनी तसेच फोटोग्राफी स्पर्धेचे परीक्षण एकनाथ जानकर यांनी केले. सर्व यशस्वी शिक्षकांना ई प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या तसेच विजेत्या स्पर्धकांचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी वंदना परब, शोभराज शेर्लेकर यांनी अखिल संघ राबवत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतूक केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा