You are currently viewing सावंतवाडी-शिरोडा मार्गाचे काम निकृष्ट – ग्रामस्थांची नाराजी

सावंतवाडी-शिरोडा मार्गाचे काम निकृष्ट – ग्रामस्थांची नाराजी

कामाच्या चौकशी बरोबर तात्काळ योग्य ती कारवाई करण्याची मागणी…

सावंतवाडी

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सावंतवाडी-शिरोडा या राज्यमार्गावर माजगाव दत्तमंदिर परिसरात सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डांबरीकरण झाल्यानंतर सिलकोट मारताना खडी न पसरल्यामुळे रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर वर आले आहे. तर दुसरीकडे ऊन वाढल्यामुळे ते वितळत आहे. त्यामुळे या ठीकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून या कामाकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावा, व तात्काळ डांबरीकरणावर आवश्यक असलेला खडी युक्त पावडरचा थर मारावा, अन्यथा अपघात घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.

गेले काही दिवस या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र डांबरीकरण झाल्यानंतर आवश्यक असलेला सिलकोट मारताना हे काम वादात सापडले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − nineteen =