कुडाळ पाठोपाठ कणकवलीतही होणार सेल्फी पॉईंट..!

कुडाळ पाठोपाठ कणकवलीतही होणार सेल्फी पॉईंट..!

कणकवली

कणकवली शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आणि कणकवलीतील युवक-युवतींना सेल्फीचे असलेले आकर्षण आणि सेल्फीबाबत युवकांमध्ये असलेली क्रेझ लक्षात घेता कणकवलीवासियांना एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कणकवली शहरात दोन नवीन सेल्फी पॉईंट उभारणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले आहे. या सेल्फी पॉइंट साठी कणकवली शहरातील तीन ते चार ठिकाणच्या जागेची पाहणी झाली असून यातील दोन चांगल्या जागा निश्चित करण्यात येणार असल्याचेही कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा