You are currently viewing दांडी शाळेची अनोखी वर्षा सहल

दांडी शाळेची अनोखी वर्षा सहल

मालवण:

मालवण तालुक्यातील दांडी शाळा ही नेहमी अनोखे उपक्रम विद्यार्थी ग्रामस्थ पालक यांच्या माध्यमातून करत असते असाच एक अनोखा वर्षा सहलीचा उपक्रम दांडी शाळेने निसर्गाच्या सानिध्यात घडवून आणला.जि.प.पूर्ण प्राथ.शाळा मालवण दांडी ता.मालवण जि.सिंधुदुर्ग मधील ४२ विद्यार्थी, २६ पालक व शिक्षकांची एक दिवसीय *वर्षा सहल* मालवणपासून अवघे १०-१२ किमी अंतरावर खैदा जवळ घुमडे ओहळ (घुमड्याचो वत) येथे काढण्यात आली.

नैसर्गिक सौंदर्याची देणगी दिली लाभलेल्या, हिरव्यागार वृक्षवल्ली ने नटलेल्या या कोकणात सध्या मान्सून जोरात आहे. या नैसर्गिक सौंदर्या बरोबरच येथील भूभागाच्या रचने मुळे तयार होणारे धबधबे पर्यटक व मान्सून प्रेमीचे लक्ष वेधून घेत आहेत. पर्यटक व मान्सून प्रेमीची देखील पाऊले सहाजिकच या धबधब्या च्या ठिकाणी स्थिरावताना दिसत आहेत. मालवण शहरापासून १०-१२ किलोमीटर अंतरावर असाच नैसर्गिक विहंगम स्वरुपात वसलेला घुमडे ओहळ अर्थात घुमड्यातलो वत येथील धबधबा पर्यटकाचे आकर्षण ठरत आहे.

मालवण-आंगणेवाडी मार्गावर खैदा आचरेकर दुकान येथून घुमडे गावी जाणाऱ्या मार्गावरच हा नेत्रदीपक विहंगम धबधबा आहे. कोकणात पावसाळ्यात निसर्गाची वेगळीच जादूची किमयागिरी पहावयास मिळते. पावसात पिकनिक ला जायचं म्हटलं तर आवडत ठिकाण म्हणजे धबधबा असलेल्या ठिकाणालाच पसंती दिली जाते. याठिकाणी मनमुराद आनंद लुटण्या साठी दांडी शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची वर्षा सहल या ठिकाणी काढण्यात आली.

शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.हेमंत चिंदरकर, उपाध्यक्ष श्री.पंकज धुरी, श्री.पांडुरंग सारंग, श्री.लिलाधर धुरी, श्री.दयानंद मालंडकर, श्री.सचिन मालंडकर, मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण मँडम, पदविधर शिक्षक श्री.शिवराज सावंत, सौ.मनीषा ठाकुर मँडम, सौ.अमृता राणे मँडम, आंगणेवाडी सेविका सौ.राधिका मोरजकर मँडम, जेनी मँडम, सौ.वराडकर, सौ.मालंडकर व पालक यांनी या वर्षा सहलीत उस्पुर्त सहभाग घेतला.

मुलांनी या पाण्यात कागदी होड्या सोडून आनंद लुटला. मनमुराद पोहण्याचा व डुंबण्याचीही मजा घेतली. सर्व पालकही यात सहभागी झाल्यामुळे ही वर्षा सहल एक अनोखा उपक्रम ठरली. या नंतर नाश्ता, भोजन निसर्गाच्या सानिध्यात सर्वांनी केल्यामुळे एक प्रकारे सर्वत्र एकोपा आणि आनंद दिसून येत होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा