You are currently viewing युवा पर्यटन क्लब च्या कोकण विभागासाठी भारत पर्यटन मंत्रालय मार्फत समन्वयक म्हणून पर्यटन महासंघाची नियुक्ती

युवा पर्यटन क्लब च्या कोकण विभागासाठी भारत पर्यटन मंत्रालय मार्फत समन्वयक म्हणून पर्यटन महासंघाची नियुक्ती

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष ,पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण

 

मालवण :

 

भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील शाळा कॉलेज मध्ये युवा पर्यटन क्लब रजिस्टर करण्याचे आदेश दिले असून भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून कोकणामध्ये युवा पर्यटन क्लब संकल्पना रुजविण्यासाठी कोकणच्या पर्यटन विकासाठीं कार्य करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास युवा पर्यटन क्लब प्रक्रिया कोकणात यशस्वी पणे राबविण्यासाठी समन्वय म्हणून जबाबदारी देण्यात आली असून श्री डी वेंकटेशन संचालक पर्यटन मंत्रालय भारत सरकारच्या आदेशाचे पत्र पर्यटन व्यावसायिक महासंघास प्राप्त झाले आहे. महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी या संबंधी माहिती दिली असून पर्यटन महासंघाच्या गेल्या दोन वर्षाच्या कोकण पर्यटन वाढीसाठी चालू असलेल्या विविध पर्यटन उपक्रमाची दखल घेऊन केंद्र सरकारने पर्यटन महासंघास ही जबाबदारी दिली असून पर्यटन महासंघ या नियुक्ती च्या माध्यमातून कोकण पर्यटन विकासासाठी शाश्वत काम करेल असा विश्वास केला आहे.

कोकण विभागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर जिह्याचा समावेश असून ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा ,कॉलेज मध्ये युवा टुरिझम क्लब स्थापन करून तसेच स्थानिक भागातील अपरिचित कोकणची पर्यटन स्थळे ,खाद्यसंस्कृती ,ऐतिहासिक ठेवा गड किल्ले ,संस्कृती जागतिक पातळीवर पोचविण्यासाठी स्थानिकांना सोबत घेऊन महासंघ काम करणार आहे केंद्र सरकाच्या पर्यटन धोरणानुसार भारताच्या पर्यटनाची कमान आता युवा वर्गाच्या हातात देऊन देशाचे युवाना देशाच्या पर्यटनाचे ब्रॅण्डअँबिसिटर बनवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव च्या निमित्ताने युवा वर्गामध्ये पर्यटन विषयी रुची आणि जागरूकता वाढवण्यासाठी भारताच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरातील शाळा कॉलेज मध्ये युवा पर्यटन क्लब स्थापना करण्यात येत आहे पर्यटन मंत्रालयाच्या दिशादर्शक नियमावली नुसार स्थापन होणाऱ्या युवा पर्यटन क्लब पर्यटन मार्गदर्शकाच्या देखरखीखाली भारताची समृद्ध विविधता व मूल्यता परिचित करून राष्ट्रीय एकतेसाठी कार्यकरून पर्यटन विषयी संवाद परिसंवाद गोष्टी स्थानिक व आतंराज्यिय यात्रेचे आयोजन करून क्लब चे युवा सदस्य पर्यटन संबधी जागरूक होऊन युवा पर्यटक भारताच्या पर्यटनांचे ब्रँडअँबिसिटर होऊन भारत देश पर्यटनाच्या विश्वपटलावर स्थापित करतील व देशभर पसरलेल्या युवा पर्यटनाच्या माध्यमातून भारताच्या विविध राज्याच्या संस्कृतीत विविधतेला जाणून मा.देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील देखो अपना देश, एक भारत श्रेष्ठ भारत च्या सूत्रास अनुसरून चरितार्थ साधून तरुणाच्या हातात पर्यटन ध्वज हा भारताच्या आर्थिक उन्नतीचा प्रमुख मार्ग बनेल हा उद्धेश केंद्र सरकारचा आहे यासाठी महासंघाच्या वतीने कोकणातील शालेय पातळीवर सातवी ते दहावी तसेच कॉलेज विद्यार्थ्यांना एकत्र करून कमी कमी पंचवीस युवांचा क्लब बनविण्यात येईल पर्यटन विषयासाठी शालेय शिक्षणामध्ये पर्यटन विषयी मार्गदर्शनासाठी एक पुस्तिका प्रकाशित केली असून त्यां प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा