You are currently viewing भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा मध्ये केंद्रीय मंत्र्यांनी घेतली बुथची बैठक

भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा मध्ये केंद्रीय मंत्र्यांनी घेतली बुथची बैठक

” मेरा बुथ सबसे मजबूत “* या पद्धतीने पक्षाचे काम झाल्यास , आगामी निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित …..
केंद्रीय गृह राज्यमंत्री मान.अजयकुमार मिश्रा*

भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी व केंद्रीय गृह राज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायत हद्दीत बुथ क्रमांक ५७ मधिल कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बुथ वर करणीय कार्याची माहीती दिली , तसेच बुथकमिटी व पन्ना प्रमुखांची जबाबदारी विशद केली.
यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान उंचाविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले .या सुधारणारया परराष्ट्र संबंधांचा लाभ देशातील सामान्य नागरिकांना मिळेल , याची काळजी ते घेतात . त्यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप यशस्वी होत आहे .मोदींच्या विचारांचा आणि कामाचा केंद्रबिंदू हा देशातील गरीब , वंचित , पीडीत , शोषित , दलीत , मागास माणुस असतो त्यामुळेच मोदी सरकार ने गेल्या ९ वर्षात अंत्योदयाच्या योजना आणल्या , त्यामुळेच गोर गरीब जनता विविध योजनांचे लाभार्थी बनले .
भाजपाला २०१४ व २०१९ या सलग दोन लोकसभा निवडणूकांत स्वबळावर बहुमत मिळाले .भाजपाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत निवडणूका जिंकून सरकारे स्थापन केली. ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवीले . पक्षाचा इतका अफाट विस्तार झालेला असताना आणि यश मिळालेले असताना पंतप्रधानांना पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांची काळजी असते .पक्षामध्ये सर्व सामन्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी मिळेल असे वातावरण आहे . सामान्य कुटुंबातील अनेक कार्यकर्त्यांना भाजपा मध्ये नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची संधी मिळते .सर्वसामान्य जनतेप्रमाणे पक्षातील कार्यकर्त्यांनाही पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे कुटुंबप्रमुखांसारखे आधार वाटतात आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे .
शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर जनतेचे काम करणारे सरकार कसे असते याचा अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे . याचाही फायदा आपल्या पक्षवाढीसाढी होणार आहे , तरी बूथवरील कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार च्या विविध कल्याणकारी योजना आपल्या बुथ वरील मतदारांना जास्तित जास्त पोहचवाव्यात असे आवाहन केले .
यावेळी मान्यवर म्हणून लोकसभा क्लस्टर चे सहसंयोजक प्रमोद जठार , लोकसभा मतदारसंघांचे संयोजक अतुल काळसेकर , ठाण्याचे जिल्हाध्यक्ष संदिप लेले , नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , माजी जिल्हाध्यक्ष व सावंतवाडी विधानसभा निवडणूक प्रमुख राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर इत्यादी उपस्थित होते .
बैठकीच्या सुरुवातीलाच ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस यांनी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजयकुमार मिश्रा व अन्य मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी माजी सभापती सौ.सारीका काळसेकर , शक्तीकेंद्र प्रमुख विष्णु उर्फ पपु परब , बुथ प्रमुख संजय मळगांवकर , सरपंच सौ. शमिका बांदेकर , ग्रा.प.सदस्य हेमंत गावडे – सौ. स्वरा देसाई – सौ.सुहीता हळदणकर – सौ. कार्तिकी पवार – कृष्णाजी सावंत , रविंद्र परब , सत्यवान परब , दत्तात्रय धुरी , कृतीका साटेलकर , समिर चिंदरकर , समिर काळसेकर , पांडुरंग कांबळी , सुवर्णा सावंत , महेश कांबळी , सुभाष हळदणकर , मधुरा कांबळी , प्रवीण पानकर ,किरण पवार , महेश राऊळ , प्रथमेश सावंत , मोरेश्वर सावंत , विश्वास पवार , सायमन आल्मेडा , निकलस फर्नांडीस , अँना डिसोझा , सरीता परब , अर्चना परब , शांती देसाई , चंद्रकांत देसाई , सावळाराम साळगावकर , अजित गवंडे , अरुण गवंडे , सुनील भोवर इत्यादी पन्ना प्रमुख उपस्थितीत होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा