You are currently viewing राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत युग्धा बांदेकर राज्यात प्रथम…

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत युग्धा बांदेकर राज्यात प्रथम…

बांदा

जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं .१ ची इयत्ता पाचवीत शिकत असलेली विद्यार्थीनी कुमारी युग्धा दिपक बांदेकर हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
युग्धा ही बांदा येथील एकलव्य ॲकडमीची विद्यार्थीनी असून इस्लामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत अबॅकसच्या माध्यमातून ५मिनिटात १२०पैकी १२०गणिते अचूक सोडवून युग्धाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेत राज्यभरातून दोनहजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. अबॅकसमुळे मुलांची एकाग्रता व आकलन शक्तीमध्ये कमालीची वाढ होऊन बौध्दिक व व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते. युग्धा हिला एकलव्य अबॅकस सेंटरच्या शिक्षिका स्नेहा केसकर /पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
युग्धाने मिळविलेल्या या यशाबद्दल बांदा केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सरोज नाईक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर बांदा सरपंच अक्रम खान व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे. युग्धाने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

इस्लामपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अबँकस स्पर्धेत येथील एकलव्य अबँकस वर्गाची तथा जिल्हा परिषद केंद्रशाळेची विद्यार्थिनी युग्धा दीपक बांदेकर ही राज्यात प्रथम आली.
अबँकसच्या माध्यमातून पाच मिनिटांमध्ये बेरीज व वजाबाकीची १२० पैकी १२० गणिते अचूक सोडवून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत राज्यभरातून दोन हजारांहून अधिक स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते.
अबँकसमुळे मुलांची एकाग्रता व आकलनशक्तीत कमालीची वाढ होते. तसेच बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. युग्धा हिला अबँकस सेंटरच्या शिक्षिका स्नेहा केसरकर-पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 16 =