You are currently viewing पंचायत समिती देवगड येथे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण संपन्न

पंचायत समिती देवगड येथे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण संपन्न

पंचायत समिती देवगड येथे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण संपन्न..!

देवगड :

शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे . ग्रामपंचायत कडून करण्यात येणारी कार्यवाह अधिक परीणामकारक निर्दोष व नियोजनद्ध व्हावी व जनतेला शुद्ध सुरक्षित पाणी पुरवठा व्हावा यासाठी असे प्रशिक्षण आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन उपविभागीय समन्वयक पाणी गुणवत्ता देवगड श्रीम .हर्षदा बोथीकर यांनी मार्गदर्शन करताना केले .
या प्रशिक्षणात शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक उपस्थित होते . यावेळी पाणी शुद्धीकरण बाबत घ्यावयाची काळजी ,टी.सी. एल पावडर साठवण व निगा , जलसुरक्षक जबाबदाऱ्या व कर्तव्ये , प्रयोगशाळेत जैविक तपासणी व रासायनिक तपासणीसाठी करावयाची wQmis वर ऑनलाईन एन्ट्री बाबत मार्गदर्शन तसेच गावस्तरावर शुद्धीकरणासाठी उपलब्ध असलेले अणुजैविक फिल्ड टेस्ट किट्स व रासायनिक पाणी नमुने तपासणीसाठी मल्टी पॅरामीटर किट बाबत मार्गदर्शन उपविभागीय समन्वयक पाणी गुणवत्ता देवगड श्रीम .हर्षदा बोथीकर यांनी केल.

प्रतिक्रिया व्यक्त करा