You are currently viewing “तळेरे हायस्कूल मध्ये कापडी पिशवी घरोघरी , पर्यावरणाचे रक्षण करी ” अभियान

“तळेरे हायस्कूल मध्ये कापडी पिशवी घरोघरी , पर्यावरणाचे रक्षण करी ” अभियान

*तळेरे हायस्कूल स्काऊट गाईड विभागाचा उपक्रम*

*५०० कापडी पिशव्या तयार करून तळेरे परिसरात जनजागृती करण्याचा संकल्प*

वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे मध्ये स्काऊट गाईड विभागामार्फत व कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थी पालक सहकार्याने कापडी पिशवी तयार करण्यात आल्या . विद्यालयाचे कलाशिक्षक व स्काऊट मास्टर पी. एन. काणेकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला . विद्यालयातील ७ वी च्या विद्यार्थ्यांनी हातशिलाई व मशिनच्या सहाय्याने तब्बल १५० पेक्षा जास्त पिशव्या तयार केल्या . यामध्ये टाकाऊ कापड , वापारात नसलेले कापड , गोणपाट यांचा पिशव्या तयार करण्यासाठी वापर करण्यात आला . यासाठी गाईड प्रमुख डी. एस .तळेकर यांचेही सहकार्य लाभले.

पुढील काही काळात इतर वर्गातही हा उपक्रम राबवून ५०० कापडी पिशव्या तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला
या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाचा 50 वा वर्धापन दिन आहे, जो #BeatPlasticPollution हॅशटॅग आणि घोषवाक्य वापरून प्लास्टिक प्रदूषणावरील उपायांवर लक्ष केंद्रित करेल. कापडी पिशवी वापराबाबत जनजागृती करून वामनराव महाडीक विद्यालयामार्फत या अभियानास एक कृतीयुक्त जनजागृती करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.

जगभरात दरवर्षी 430 दशलक्ष टनांहून अधिक प्लास्टिक तयार केले जाते, त्यापैकी निम्मे प्लास्टिक फक्त एकदाच वापरण्यासाठी डिझाइन केले जाते. त्यातील 10 टक्क्यांपेक्षा कमी प्लास्टीकचा पुनर्वापर केला जातो. अंदाजे 19-23 दशलक्ष टन दरवर्षी तलाव, नद्या आणि महासागरांमध्ये मिसळतात. मायक्रोप्लास्टिक्स – 5 मिमी व्यासापर्यंतचे छोटे प्लास्टिकचे कण – अन्न, पाणी आणि हवेत मिसळतात. असा अंदाज आहे की ग्रहावरील प्रत्येक व्यक्ती वर्षाला 50,000 पेक्षा जास्त प्लास्टिकचे कण श्वासाव्दारे ग्रहण करतो, आणि बरेच काही. फेकून दिलेले किंवा जाळलेले एकदा वापरलेले प्लास्टिक मानवी आरोग्य आणि जैवविविधतेला हानी पोहोचवते आणि पर्वताच्या शिखरापासून समुद्राच्या तळापर्यंत प्रत्येक परिसंस्थेला प्रदूषित करते.

जागतिक पर्यावरण दिनाची थीम २०२३ ही फक्त पर्यावरण दिनानिमित्तच सिमित नसून समाजात याविषयी जागृकता निर्माण करण्याचे कर्तव्य असल्याचे यावेळी पी.एन.काणेकर म्हणाले.
दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त अनेक उपक्रमांचे नियोजन केले जाते . टिकाऊ उत्पादनांच्या वापरास प्रोत्साहन देणे आणि प्लास्टिकच्या वापरास परावृत्त करणे हा उद्देश असल्याचे गाईड प्रमुख व सहा. शिक्षिका डी. एस. तळेकर म्हणाले.

या उपक्रमाचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , शाळा समिती चेअरमन अरविंद महाडीक , , दिलीप तळेकर , शरद वायंगणकर , प्रविण वरूणकर , संतोष जठार , संतोष तळेकर , निलेश सोरप , उमेश कदम , मुख्याध्यापक अविनाश मांंजरेकर , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व स्वागत केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 16 =