महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जीवन आनंद संस्था संचालित संविताश्रम पणदूर येथे वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने भेट देऊन २ हॉस्पिटल बेड, २ सलाईन स्टॅण्ड, १ फोल्डींग स्ट्रेचर, १ वॉटर क्युरीफायर भेट देण्यात आली.
तर जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय अणाव येथे भेट देऊन २ वॉकर, व २ व्हीलचेअर भेट देण्यात आली. येथील ज्येष्ठ नागरिकांसोबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते दीपक केसरकर मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.