You are currently viewing पणदूर संविताश्रम, आनंदाश्रय येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा

पणदूर संविताश्रम, आनंदाश्रय येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जीवन आनंद संस्था संचालित संविताश्रम पणदूर येथे वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने भेट देऊन २ हॉस्पिटल बेड, २ सलाईन स्टॅण्ड, १ फोल्डींग स्ट्रेचर, १ वॉटर क्युरीफायर भेट देण्यात आली.

तर जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय अणाव येथे भेट देऊन २ वॉकर, व २ व्हीलचेअर भेट देण्यात आली. येथील ज्येष्ठ नागरिकांसोबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते दीपक केसरकर मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा