You are currently viewing मनाचा गुंता

मनाचा गुंता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम ललित लेख*

*मनाचा गुंता*

तुझ्या स्मृतींसोबत येतो
सांजवेळचा मिट्ट अंधार..
अंधाऱ्या रात्रीस सोबती
पाउस अन् वारा थंडगार..

किनाऱ्याच्या ओढीने धावत येणाऱ्या सागराच्या उंच उंच फेसळणाऱ्या लाटांसोबत थंडगार वाऱ्याची झुळूक येते जणू पुढे येत ती किनाऱ्याला त्याची प्रियतमा येत असल्याचा सांगावा देते अन् आपल्या सोबत पाण्याचे तुषार सर्वांगावर बरसवून सुरूच्या बनात जाऊन सूरूच्या मिठीत विसावते… किनाऱ्याला भेटण्याच्या ओढीने येणाऱ्या लाटा कुणी खडकांवर आदळून फेसाळतात अन् लुप्त होतात तर कुणी किनाऱ्याच्या मिठीत अशा काय सामावतात की क्षणभंगुर भेटीत सुद्धा आपल्या भेटीची निशाणी सोडून जातात…
ती लाटांची किनाऱ्याशी होत असलेली विलक्षण भेट…तो प्रेमातील क्षणिक सुखाचा होणारा मीलन सोहळा..खोलवर सागराच्या गर्भातून येताना लाटांची भेटीसाठीची तळमळ.. ओढ अन् ओढीपोटी खडकांवर आदळून देखील हास्य झंकार करत जणू मोगरा, जाई, जुईच्या शुभ्र धवल फुलांचा वर्षाव व्हावा तसं फेसाळत किनाऱ्याच्या मिठीत सामावणे…क्षणभर सुखात आयुष्य भराच्या प्रेमाच्या घागरी भरून घेत सासरी जाणाऱ्या सासुरवासिनी सारखी माहेरातून जड पावलांनी पुन्हा सागराच्या खोल जलाशयात जातानाचे ते अलौकिक पण भावभावना गुंतलेलं दृश्य मी भरल्या डोळ्यांनी पाहत होतो…एकीकडे भेटीचा आनंद अन् दुसरीकडे क्षणात विरहाचं दुःख…तरीही आनंदाश्रुनी भरलेल्या नयनांनी लाटांनी सागराकडे परतणे मनाला चलबिचल करून गेलं… किनारा अन् लाटांच्या प्रेम सागरात मी स्वतःच डुंबून गेलो… अन् तुझ्या भेटीची उत्सुकता शिगेला पोचली… मन कासाविस झालं…तू न आल्यानं मन सैरवैरा झालं… सुरू बनात सळसळणाऱ्या वाऱ्यासोबत दूर दूर पळू लागलं.. मनाला माझा सहवास नकोसा झाला.. अंधार पडू लागला..लाटांचे तुषार सर्वांगाशी खेळू लागले… रोमरोम शहारू लागला…प्रेयसी सारखा हळुवार स्पर्श करत अंगाला सागराकडून येणारा गार वारा झोंबू लागला.. तुझ्या नकळत होणाऱ्या स्पर्शाने अंगावर काटा उभा राहतो तसाच काटा सर्वांगावर उभारला… तुझा स्पर्श न होता अंगावर उभारलेला काटा तू सोबत नसूनही स्पर्शातून तू जवळ असल्याची जाण करून देत होता… चंद्राच्या शीतल छायेचं प्रतिबिंब दूर सागरात लाटांवर स्वार झालं होतं अन् त्या चांदव्याच्या प्रतिबिंबात मी माझ्या चंद्रकलेचं रूप न्याहाळत होतो…
आता सोबत उरलेली ती मध्ये मध्ये ऐकू येणारी लाटांची गाज, विरान शांतता अन् चंदेरी रात्र…! तू न आल्याने चिंतातूर मन..विचारांचे कोलाहल, शंका कुशंकांचे मनातले थैमान..! तू नव्हतीस सोबत..ना आता येणार होतीस… होता केवळ सांजवेळी भेटीस आलेला मिट्ट अंधार अन् तुझ्या स्मृती…! अचानक अवकाशात सौदामिनी थयथयाट करू लागली…इकडून तिकडे क्षणार्धात पळू लागली…पावसाचे काळेकुट्ट ढग नभांगणी गर्दी करू लागले…चांदवा सुद्धा तुझ्यासारखा तारकांची साथ सोडून ढगांच्या आड दडून बसला…तसा मनात तुझ्या स्मृतीचा पाउस दाटला… तू भेटीस आलेली ती सांज पापण्यांवर येऊन माझ्याच नेत्रपटलांशी लपाछपी खेळू लागली… डोळे मिटतात पापण्यांवरून हळूच मनात जाऊन लपून बसू लागली… स्मृतींच्या गलक्यात कधी तू हृदयात येऊन बसलीस समजलेच नाही…
आता तुझ्या आठवांचा पाऊस संथपणे मनामनावर बरसू लागला… तन मन ओलेचिंब झाले.. थंडगार वारा अंगाला स्पर्श करत धावत सुटला…जणू तुझाच स्पर्श तनाला झाला अन् सर्वांगावर रोमांच उभा राहिला… मन बेभान…बेधुंद झालं…तुझ्या स्मृतींच्या वर्षावात न्हाऊन गेलं… अंगणी परिजाताचा सडा सांडावा…अन् त्या मंद सुवासाने मन मोहून जावे… अगदी तसाच तुझ्या स्मृतींचा पारिजात मनांगणी सडा सांडू लागला…तुझ्या केशरी स्मृतींच्या देठांवर शुभ्र पंखुड्यांनी रिंगण केलं तुला मनमंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनी बसवलं…
मनातला बेधुंद, बेभान कोसळणारा पाऊस एव्हाना थांबला होता… मन तुझ्या स्मृतींमध्ये न्हाऊन सुखावलं होतं… हुरहुरत्या सांजेला झुरणारं…कधी गहिऱ्या डोळ्यांमध्ये पार बुडणारं… फुलपाखरांसम भिरभिरणारं…आकाशी स्वप्नात स्वतःला हरवून बसणारं…मोहाच्या दोन चार क्षणांवर भाळणारं…मन तुझ्या स्मृतींच्या आठवांनी गहिवरलं होतं…!
मन भरकटलेलं, भेदरलेलं
मन स्वप्नांमध्ये हरवून बसलेलं..
मन पापण्यांच्या अंगणी हसलेलं..
मन नयनांच्या पागोळीतून बरसलं..
मन स्मृतींमध्ये चिंबचिंब भिजलेलं..

©दीपक पटेकर {दीपी}
सावंतवाडी
८४४६७४३१९६

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा