You are currently viewing जुन्या शिवसैनिकांचे रक्त सळसळले….

जुन्या शिवसैनिकांचे रक्त सळसळले….

संवाद मीडिया इम्पॅक्ट

महाराष्ट्रात शिवसेना प्रणित महाविकास आघाडीचे सरकार असूनही सावंतवाडी शहरातील शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर मागील काही महिन्यांपासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर देखील कित्येक महिने मतदारसंघाकडे फिरकले देखील नव्हते. गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील पदांचे वाटप झाले नाही किंवा पदाधिकारी बदलही झाले नाहीत, त्यामुळे कोणीच पक्षीय कार्यात झोकून देऊन काम करताना दिसत नाहीत. त्याचाच प्रत्यय आला तो सावंतवाडीच्या शिवाजी चौक (गवळी तिठा) येथील दिमाखात फडकत असलेल्या भगव्या झेंड्याचा रंग बदलला तरी झेंडा बदलला न गेल्यामुळेच.
शिवसेनेची पदे उपभोगत असलेल्या शहरातील किंवा तालुका स्तरावरील कोणीही कार्यकर्त्यांनी संवाद मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेतली नव्हती. परंतु बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेला कित्येकांनी वाऱ्यावर सोडून गेल्यावरही शिवसेना जोपासली, जपली, जिवंत ठेवली ते जुने कट्टर शिवसैनिक मात्र या बातमीमुळे दुखावले गेले, त्यांचा अंगात शिवसेनेवर असलेले प्रेम जागृत झाले, त्यांचे रक्त सळसळले…. आणि तात्काळ जुन्या कट्टर शिवसैनिकांनी सावंतवाडीच्या शिवाजी चौकात फिका पडून रंग बदललेला झेंडा उतरवून नवीन झगमगीत भगवा झेंडा डौलाने फडकवला आणि आजही आपण शिवसैनिक आहोत याची प्रचिती आणून दिली.

शिवसेना सत्तेत असताना पद उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करूनही शिवाजी चौकात पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकविण्यासाठी सतीश नार्वेकर, विलास सावंत, महेश पांचाळ, अळवणी या शिवसेनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + one =