You are currently viewing मालवणच्या ग्रामदैवतांचा उद्या दीपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव

मालवणच्या ग्रामदैवतांचा उद्या दीपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव

मालवण

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव उद्या गुरुवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. मालवण येथील श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी,श्री देवी भावई, श्री देवी पावणाई व इतर देवांचा दीपोत्सव दि १८ रोजी होत आहे.

त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दीपोत्सव दिवशी दुपारी समाराधना, रात्रौ १० वाजता पुराणवाचन सांगता, त्यानंतर मंदिर व मंदिराच्या कळसावर कोहाळ्याचे दिवे करुन श्री देवनारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी या पाचही मंदिरांवर दिप लावून दीपोत्सव साजरा होणार आहे. व त्यानंतर पालखी प्रदक्षिणा व मिरवणूक होणार असून श्री देव रामेश्वर एकरात्र श्री देव नारायण भेटीस थांबतो. रात्री १२.३० वाजता गोरे दशावतारी मंडळाचे नाटक व पहाटे दहीहंडी वगैरे देवस्थानचे कार्यक्रम होणार आहेत.

त्यानंतर श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण पालखी श्री देव रामेश्वर मंदिरकडे मार्गस्थ होते. या कार्यक्रमाला प्रथेनुसार रात्री ९ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवाजी महाराजांच्या राजदंड (चांदिचा) या उत्सवाला किल्ल्यावरील मानकरी वाजत गाजत किल्ल्यावरुन घेऊन येतात व ते उत्सव समाप्तीनंतर सकाळी मानाचे श्रीफळ (प्रसाद) घेऊन मार्गस्थ होतात. तरी या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा