You are currently viewing शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरचे संस्थाध्यक्ष शशिकांत अणावकर सर यांना देवज्ञा

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरचे संस्थाध्यक्ष शशिकांत अणावकर सर यांना देवज्ञा

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरचे संस्थाध्यक्ष शशिकांत अणावकर सर यांना देवज्ञा

कुडाळ :

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरचे संस्थाध्यक्ष शशिकांत अणावकर सर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना कुडाळ येथील डॉ. जी. टी. राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री २.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

गेली अनेक वर्षे ते शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर येथे संस्थाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी अणाव गावचे सरपंच पद देखील भूषविले आहे. पंचक्रोशीत त्यांचा फार मोठा विद्यार्थीवर्ग देखील आहे. त्यांच्या या निधनामुळे संपूर्ण पंचक्रोशी शोकसागरात बुडाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 18 =