You are currently viewing सिंधुदुर्गातील 15 हजार लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ

सिंधुदुर्गातील 15 हजार लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना अभियानचे प्रदेश सचिव नारायण सावंत यांची माहिती

सिंधुदुर्ग

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान मार्फत जिल्ह्यातील पंधरा हजाराहून अधिक लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला. अभियानचे प्रदेश सचिव नारायण सावंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण सावंत यांची भेट घेऊन अभियानाच्या कामाचा अहवाल सादर केला.

केंद्र शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना अभियान ही स्वतंत्र संस्था स्थापन केली आहे. त्यामार्फत केंद्राच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून दिला जात आहॆ. अभियानचे जिल्हाप्रमुख तथा प्रदेश सचिव नारायण सावंत यांनी पुढाकारातून हे अभियान सुरु आहे. गेल्या वर्षाभरात पंधरा हजाराहून अधिक जणांना या अभियानातून विविध योजनाचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये 13 हजार 700 ई श्रम कार्ड काढण्यात आली. पीएम किसान सन्मान योजना नोंदणी 868, आयुष्यभारत 126, विधवा पेन्शन योजना 25, अपंग पेन्शन योजना 77, बांधकाम कामगार कल्याण योजना लाभ 107, प्रधानमंत्री आवास योजना 17, शेतकरी कर्ज माफी योजना 112, हेल्थ आयडी 625, मागासवर्गीय विद्यार्थी मोफत टॅब योजना 147 अशा योजनांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात, महाविद्यालयात शिबीर आयोजन करून व सावंतवाडी गवळीतिठा येथील मध्यवर्ती कार्यालयात लाभार्थी नोंदणी करण्यात आली. श्री. सावंत यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. अभियाना मार्फत केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली. यावेळी केंद्र शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यत पोहचविण्यासाठी अभियानाकडून सुरु असलेल्या कामाचे श्री. राणे यांनी कौतुक केले. या कामासाठी आवश्यक असलेली सर्व मदत आपल्याकडून देण्याचे आश्वासन देत लवकरच कार्यालयाला देणार असल्याचे श्री. राणेनी सांगितले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभत असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा