You are currently viewing उंबर्डे येथे काँग्रेसची सभा संपन्न

उंबर्डे येथे काँग्रेसची सभा संपन्न

वैभववाडी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वैभववाडीतील उंबर्डे येथे काँग्रेसची सभा संपन्न झाली. वैभववाडी पंचायत समीतीच्या माजी सभापती मीनाताई बोडके यांनी सर्वांचे स्वागत केले. उंबर्डे गावाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, जिल्हा सरचिटणीस प्रविण वरुणकर, जिल्हा सचिव आनंद परूळेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी मार्गदर्शन करताना काँग्रेसपक्षाच्या सरकरनेच देश उभारणीचे काम केले असून देशात द्वेशाचे राजकारण करणाऱ्या भाजपला दिल्ली पासून गल्ली पर्यंत सत्तेतून बेदखल करण्याची गरज आहे. आपल्या भावीपीढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेसची सत्ता देशात असणे गरजेचे आहे म्हणून याची सुरूवात आपल्या गावापासून केली पाहीजे.


या सभेला वैभववाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादामिया पाटणकर, वसंत नाटेकर, बाळा पांचाळ, श्रेया मुद्रस,अहमद बोबडे, गुलजार काजी,दिपक मोपेरकर, वसीम काजी,समीर मौलवी,अकबर लांजेकर, तन्वीर बोबडे,फैजान पाटणकर,अहमद पाटणकर, नवाज पाटणकर,आजाद पाटणकर,हर्षद थोडगे,प्रणित मोपेरकर,मारुती मोपेरकर, अजय मोपेरकर,अशरफ पाटणकर,समीर बोबडे,मोहिनुद्दीन रमदूल,मुराद लांजेकर,गौस सारंग, नजीर थोडगे,अर्षद थोडगे,रमजान रमदूल,जहिदा बोबडे,रेहाना बोबडे,शकिला थोडगे,फातिमा पाटणकर, सुलताना रमदूल, नुरजान बोतरे,दिलशान बोबडे,जैनब बोबडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − five =