You are currently viewing जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट व भारतीय जनता पार्टी वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट व भारतीय जनता पार्टी वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट व भारतीय जनता पार्टी वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

 

*जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट व भारतीय जनता पार्टी वजराट* यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, व पूर्ण प्राथमिक शाळा वजराट नं १ मधील विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहोळा व प्रशाळेचे शिक्षक व शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या गावातील कर्मचारी यांचा सत्कार समारोह रविवार दिनांक ९ जुलै २०२३ रोजी ग्रामपंचायत सभागृह, वजराट येथे पार पडला.
या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप पदाधिकारी सोमनाथ टोमके, ज्ञानेश्वर केळजी, डॉ. प्रसाद देवधर, बंड्या सावंत, गावप्रमुख सूर्यकांत परब, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव परब, रमेश राणे, अण्णा वजराटकर, ग्रामपंचायत सदस्य रसिका मेस्त्री, प्रवीण कांदे, नामदेव कांदे हे मान्यवर उपस्थित होते
यावेळी दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, व पूर्ण प्राथमिक शाळा वजराट नं १ मधील विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच श्री. देवानंद चव्हाण (मुख्याध्यापक आडेली हायस्कूल), सौ. बोवलेकर मॅडम (मुख्याध्यापक नेमळे हायस्कूल), श्री. खरात सर, सौ. बांदिवडेकर मॅडम, सौ. पाताडे मॅडम, सौ. पाटील मॅडम, सौ. सुर्वे मॅडम, श्री. परब सर या शालेय शिक्षकांचा तसेच श्री. रवींद्र मोरे, श्री. सावळाराम वजराटकर, श्री.आनंद बोवलेकर, श्री. विजय कसले, श्री. मेघश्याम भिमसेन परब, श्री. दिगंबर परब, श्री. सोनसुरकर, श्री. मारुती पेडणेकर, श्री. चंद्रकांत परब, श्री. प्रभाकर मेस्त्री या शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त व्यक्तींचा व कोरोना काळापासून आतापर्यंत वजराट गावात चांगले आरोग्य सेवा बजावणारे डॉ. वनकुद्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वजराट गावाच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट व भारतीय जनता पार्टी वजराटचे पदाधिकारी नितीन चव्हाण, वामन भोसले, राजन परब, नितीन परब, आनंद परब, वसंत परब, महेश राणे, विकास चव्हाण, सचिन देसाई यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − two =