You are currently viewing वेंगुर्ले पोलिसांची आजगाव येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर धाड

वेंगुर्ले पोलिसांची आजगाव येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर धाड

वेंगुर्ले :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दारू मटका जुगार यासारख्या अनैतिक धंद्यांबरोबरच वेश्याव्यवसाय ही चालू आहे हे आजच्या आजगाव येथील कारवाईमुळे समोर आले आहे.

वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकासह आजगाव येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसाया वर धाड टाकली. यावेळी केलेल्या तपासणीत तेथे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीसह तीन परराज्यातील महिला आढळून आल्या. पोलिसांनी या चौघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई सुरू केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 6 =