You are currently viewing बांद्यात मतदार यादीचे सर्वेक्षण करून बोगस नावे काढून टाका

बांद्यात मतदार यादीचे सर्वेक्षण करून बोगस नावे काढून टाका

– नरसिंह उर्फ बाबा काणेकर व बांदा भाजपा पदाधिकारी यांचे भाजपा जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन….

बांदा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांगलादेशी मुस्लिम मतदार सापडल्याने या पार्श्वभूमीवर बांदा शहरात मतदार यादीचे सर्वेक्षण करून बोगस मतदारांची नावे यादीतून काढून टाकावी अशा मागणीचे निवेदन भाजपचे बांदा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना आज दिले.

निवेदनात त्यांनी म्हटले की, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावात बांगलादेशी मुस्लिमांची नावे मतदार यादीत सापडत आहेत. बांदा शहरात देखील परप्रांतीयांचे वास्तव्य वाढले असून या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे सर्वेक्षण करणे ही काळाची गरज आहे. अनेकजण आधारकार्ड व मतदान कार्ड लिंक करून घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देत मतदार यादीचे तातडीने सर्वेक्षण करावे. तसेच मतदारांचे तपशील प्रत्यक्ष पत्त्यावर जाऊन तपासावे व संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिस कारवाई करावी, तसेच आधार नोंदणी सक्तीची करून त्याकरीता विशेष कार्यक्रम आखावा. यासाठी बांदा ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ आपल्याला पूर्णपणे सहकार्य करतील अशी ग्वाही दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, ग्रामपंचायत सदस्या सौ. रुपाली शिरसाट, आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, गुरु कल्याणकर, सावंतवाडीचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

तहसीलदार श्री. पाटील यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन काणेकर यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 6 =