You are currently viewing हुमरमळा-वालावल गावातील महिला आर्थिक सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न : सौ.अर्चना बंगे

हुमरमळा-वालावल गावातील महिला आर्थिक सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न : सौ.अर्चना बंगे

कुडाळ

हुमरमळा वालावल गावातील महिलांचे नुसते बचतगट सुरू करून अनुदानापुरते मर्यादित न ठेवता या बचत गटांच्या माध्यमातून माझ्या गावातील महीला कशा आर्थिक सक्षम होतील यासाठी माझे कायमच प्रयत्न आहेत असे मत हुमरमळा वालावल सरपंच सौ अर्चना बंगे यांनी व्यक्त केले. हुमरमळा येथे नारळ फळ पिक मार्गदर्शन आणि गावातील बचत गटांची जनरल सभा झाली यावेळी बंगे बोलत होत्या.

यावेळी सौ बंगे म्हणाल्या हुमरमळा वालावल गावातील बचत गटांच्या महीलांनी बनवलेले अनेक खाद्य वस्तू सातासमुद्रापार गेल्या. तसेच दील्ली, मुंबई अशा अनेक बचत गटांच्या सरस मध्ये माझ्या गावातील बचत गटांनी सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवली. याचा मला सार्थ अभिमान आहे. दील्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महा सरस मेळाव्यात तर माझ्या गावातील बचत गटांच्या स्टाॅल अनेक देशातील महान व्यक्तींनी भेट देऊन कौतुक केले. यातच आम्हाला  खासदार विनायक राऊत यांनी तर आपल्या मतदारसंघातील बचत गट म्हणून जी आमची सर्व गैरसोय होती ती दुर करुन स्वतः या बचतगटाच्या स्टाॅल भेट देऊन विचारपूस केली.  यापुढे ही माझ्या गावातील महीला ही स्वतःच्या पायावर उभी राहाण्यासाठी माझे कायम प्रयत्न नेहमीच असतील हीच माझी सेवा चालू राहील.  माझ्या गावातील महीला कायमच मला नेहमी सहकार्य करीत असतात आणि त्यांच्याच जिवावर तर मी ही ताकद मिळवली आहे असे सांगून बंगे म्हणाल्या माझ्या बचतगटांना अनेक पुरस्कार मिळाले हे मिरवण्यासाठी नसुन ते पुरस्कार पुढे काम करण्यासाठी स्पुर्थी मिळण्यासाठी आहेत याच इर्षेने पुढे काम करत राहाणार.

यावेळी हुमरमळा वालावल गावचे कृषी सेवक श्री सुद्रिक हे गावातील शेतकरी यांना चांगली सेवा आणि कृषी योजना समजाऊन सांगितल्या. अशा या गुणी कर्मचा-यांचा सत्कार पंचायत समीती सदस्य अतुल बंगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बचत गटाच्या समन्वयक श्रीमती म्हाडदळकर यांनीही महीलांना मार्गदर्शन केले तसेच नेरुर कृषी सेवक परब यांनी नारळ पिक यावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दोलताडे, श्री खराडे कडावल मंडळ कृषी अधिकारी कोळी, हुमरमळा वालावल ग्रामसेवक श्रीम अपर्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ रमा गाळवणकर, ग्रामपंचायत सदस्या सौ शिल्पा मयेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ सोनाली मांजरेकर, अंगणवाडी सेविका प्रीती वेंगुर्लेकर, मानसी वालावलकर, सुक्ष्मा वालावलकर, कृषी मित्र अजित केसरकर, कृषी मित्र विजय पेडणेकर व महीला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =