You are currently viewing तरंदळे कुंदे वाडी रस्त्यावर पावसामुळे कोसळले झाड

तरंदळे कुंदे वाडी रस्त्यावर पावसामुळे कोसळले झाड

सरपंच सुशील कदम सह ग्रामस्थांच्या मदतीने हटवले झाड

कणकवली

तरंदळे कुंदे वाडी रस्त्यावर जोरदार पावसामुळे आज दुपारी 3 वाजता झाड कोसळले. घटना स्थळी सरपंच सुशिल कदम, माजी उपसरपंच.संदेश सावंत,तंटा मुक्त उपाध्यक्ष.सत्यवान राणे,ग्रामपंचायत सदस्या.संजना राणे यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत पाहणी केली. ग्रामस्थांच्या मदतीने खास करून रामचंद्र मुंबरकर यांच्या सहकार्याने,तसेच संतोष राणे,कल्पेश सावंत, पंढरी परब यांच्या मदतीने रस्त्यावरील जाड बाजूला करून 2 तास ठप्प झालेली वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली.घटना स्थळी तलाठी मॅडम यांनी धाव घेवून पाहणी केली.त्याबद्दल सरपंच सुशिल विजय कदम यांनी आभार मानले.तसेच जे ग्रामस्थ मदत करण्यासाठी उपस्थित होते त्यांचे सुध्दा आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =